पाठलाग करुन महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन

महिला पोलीसाचा पाठलाग करून छेडछाड करुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दिलीप माने (रा. शनी मारुती मंदिरापाठीमागे, सातारा) असे संशयिताचे नाव असून त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0afb6b82-ab81-11e8-83ed-ddf7eb8c9b4c’]

मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून २५ वर्षीय महिला पोलिसाचा पोलीस वसाहत, सातारा तालुका पोलीस ठाण्यासमोर तसेच राजवाडा परिसरात दिलीप माने हा पाठलाग करत होता. त्याचबरोबर जाणूनबुजून हात व पायाला स्पर्श करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत होता. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजया वंजारी करीत आहेत.

पुणे पाेलिसांनी अटक केलेल्या  ‘त्या’ पाच जणांबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून राज्य सरकारला नोटीस  

शहरामध्ये महिला पोलीसच सुरक्षीत नाहीत तर इतर सामान्यांच्या सुरक्षीततेचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात टवाळखोर महिलांची आणि मुलींची छेड काढतात. मात्र, टवाळखोरांना घाबरुन पिडित महिला तक्रार देत नाहीत. महिला पोलिसाचा पाठलाग करुन विनभंग केल्याच्या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सुप्रिया सुळे यांचे पुन्हा एकदा ‘सेल्फी विथ खड्डा’ आंदोलन