धडाकेबाज कारवाई  : लाच घेताना महिला पोलिस कर्मचार्‍याच्या पतीला अटक

बीड :  पोलीसनामा ऑनलाईन

वारंट न बजाविण्यासाठी 2 हजार रूपयाची लाच घेवुन त्यानंतर देखील वेळावेळी लाचेची मागणी करून पुन्हा 2 हजार रूपयाची लाच नवर्‍यामार्फत घेणार्‍या बीड शहर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस नाईक रिझवाना जहीर सय्यद यांच्याविरूध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, रिझवाना यांचे पती जहीर सय्यद यांना 2 हजार रूपयाची लाच घेताना आज (बुधवारी) रंगेहाथ पकडण्यात आले आहे. महिला पोलिस कर्मचार्‍याच्या पतीला लाच घेताना अटक केल्याने बीड शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6f0bea67-ab5d-11e8-a709-219cab7903f3′]

तक्रारदार यांच्याविरूध्द लातूर येथील न्यायालयात एक खटला चालु आहे. त्या खटल्यातील वारंट बजाविण्यासाठी बीड शहर पोलिस ठाण्यात आले होते. महिला पोलिस नाईक रिझवाना जहीर सय्यद यांच्याकडे वारंट डयुटी असल्याने त्यांनी तक्रारदारास गाठले आणि त्यांच्याकडून 2 हजार रूपयाची लाच घेतली. या घटनेला बरेच दिवस होवुन गेले. त्यानंतर तक्रारदार आणि  पोलिस नाईक सय्यद यांची सिव्हिल रूग्णालयात भेट झाली. त्यावेळी महिला कर्मचारी सय्यद यांनी तक्रारदारास तारखेला हजर राहिला होतात काय अशी विचारणा केली. तक्रारदाराने प्रमाणिकपणे त्यांना तारखेला हजर राहिलो नाही म्हणून सांगितले आणि त्यानंतर महिला पोलिस सय्यद या तक्रारदाराकडे पैशासाठी मागे लागल्या. वेळावेळी सय्यद यांनी तक्रारदारास फोन करून लाचेची मागणी केली. तक्रारदाराने त्याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सापळा रचला. महिला पोलिस कर्मचारी सय्यद यांचे पती जहीर सय्यद यांनी तक्रारदाराकडून 2 हजार रूपयाची लाच पंचा समक्ष घेतली. त्यावेळी त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. पतीवर अ‍ॅन्टी करप्शनने रेड टाकल्याचे समजताच रिझवाना सय्यद यांच्या मोबाईलचे नेटवर्क बंद पडले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी रिझवाना सय्यद यांचा शोध घेत आहेत.

औरंगाबादच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अप्पर अधीक्षक एस.आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधिक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलिस कर्मचारी अशोक ठोकळ, दादासाहेब केदार, विकास मुंडे आणि अमोल बागलाने यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करीत आहेत.

शाळा, महाविद्यालयासमोरील रोडरोमिओंचा बंदोबस्त