महिलेनं मागितली नोकरी, ‘बिकीनी’ फोटो पोस्ट करून कंपनीनं केलं ‘अपमानित’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका अमेरिकन कंपनीने एका महिलेचा बिकिनीत फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर टाकून अशा प्रकारे कपडे घातल्याने नोकरी मिळत नाही, असे म्हणत तिचा अपमान केला. त्यानंतर आता अमेरिकन कंपनी Kickass Masterminds ची मोठ्या प्रमाणात आलोचना होत असून त्यांना याबद्दल माफी मागावी लागली आहे.
Bikini
यानंतर 24 वर्षीय एमिली क्लो हिने या मुद्द्याला ट्विटरवर उचलून धरल्यानंतर कंपनीला या प्रकरणी तिची माफी देखील मागावी लागली. या कंपनीने एमिली क्लो हीचा फोटो पोस्ट करत लिहिले कि, तुमच्यापैकी अनेकजण कामाच्या शोधात आहेत. त्यामुळे आमच्याकडे अर्ज केलेल्या उमेदवारांनी अशा प्रकारचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करू नयेत. तुम्ही खासगी आयुष्यात काहीही करा मात्र या फोटोंमुळे तुम्हाला नोकरी मिळणार नाही. यामुळे तिला मोठा धक्का बसला. तिने प्रत्युत्तरादाखल ट्विट करत म्हटले कि, बिकिनीवरील माझ्या एका फोटोमुळे मला वाईट ठरविण्यात आले. मी यामुळे अनप्रोफेशनल झाले. मात्र तिच्या या ट्विटननंतर तिला सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. अनेकांनी तिच्या या बिकिनीत फोटोचे कौतुक देखील केले.
Bikini
दरम्यान, कंपनीच्या संस्थापक सारा क्रिस्टेनसन यांनी या गोष्टीचा इन्कार केला असून अशा प्रकारच्या कपडे घालण्याला मात्र त्यांनी तीव्र विरोध केला आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like