अतिक्रमण हटवण्यास महिलेचा विरोध ; महापालिकेच्या दारात टाकले कांदे-बटाटे 

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – अतिक्रमण हटवणाऱ्या पथकाचा सांगलीतील एका महिलेने विरोध केला आहे. एका महिलेने तिच्या हातगाड्यावरील कांदे बटाटे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर टाकून आपला विरोध दर्शवला. अनेक फेरीवाले रस्त्यावर हातगाड्या लावून तसेच रस्त्यावर बसून व्यवसाय करतात. अशांवर अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी कारवाई सुरू केली. मात्र एका महिलेने तिच्या हातगाड्यावरील कांदे बटाटे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर टाकले.

अतिक्रमण निर्मूलन पथकाने  अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू केल्यानंतर पालिकेने रस्ते मोकळे करण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यांच्या या मोहीमेला काही फेरीवाल्यांनी विरोध केल्याचे पाहायला मिळाले. अनेक फेरीवाले  शहरात रस्त्यावर हातगाड्या लावून तसेच रस्त्यावर बसून व्यवसाय करतात अशांवर ही कारवाई होती.

कारवाई करण्यास आलेल्या अतिक्रमण निर्मूलन पथकास एका महिलेने तीव्र विरोध केला.  परंतु अधिकाऱ्यांनी तिचे काहीच ऐकले नाही. हे पाहून संतापलेल्या या महिलेने थेट महापालिका गाठली. हातगाडीवर कांदे-बटाट्यांची विक्री करणाऱ्या महिलेने पालिकेच्या प्रवेशद्वारातच कांदे, बटाटे टाकून कारवाईचा निषेध केला.