CAA विरोधी सभेत महिलेकडून ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची नारेबाजी, ओवेसींनी दर्शवला ‘विरोध’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात बंगळूरात एका कार्यक्रमात एका महिलेने आयोजकांना त्रागा करण्यास भाग पाडले. कारण या महिलेने कार्यक्रमांच्या मंचावरुन ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची नारेबाजी केली. गुरुवारी जेव्हा कार्यक्रमात नारेबाजी झाली तेव्हा या मंचावर एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी देखील उपस्थित होते. त्यांनी या महिलेने केलेल्या नारेबाजीबद्दल नाराजी व्यक्त केली आणि म्हणाले की आपण येथे भारतासाठी जमलो आहोत.

या महिलेचे नाव अमूल्या असल्याचे सांगितले जात आहे, तिने लोकांना पाकिस्तान जिंदाबादचे नारे देण्याचे आवाहन केले. हा प्रकार संविधान बचाओच्या कार्यक्रमात घडला. जेव्हा आयोजकांनी या महिलेला संबोधन करण्यासाठी मंचावर बोलावले. जेव्हा या महिलेने ही नारेबाजी केली, त्यावेळी ओवेसी मंचावर उपस्थित होते.

नारेबाजी करणाऱ्या महिलेकडून माईक काढून घेण्यासाठी पुढे आले ओवैसी –
महिलेने जेव्हा अशी नारेबाजी सुरु केली तेव्हा मंचावर उपस्थित ओवेसी महिलेच्या दिशेने माइक तिच्या हातातून काढून घेण्यासाठी पुढे आले. लोकांनी महिलेला मंचावरुन खाली उतरवण्याचा देखील प्रयत्न केला परंतु महिला अडून राहून नारेबाजी करत राहिली.

विरोधकांनी महिलेला असे करण्यास सांगितले –
पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि महिलेला मंचावरुन खाली उतरवले. यानंतर ओवेसींनी सभेला संबोधित करताना सांगितले की, मी आणि माझा पक्ष या महिलेशी सहमत नाही. आम्ही या घटनेचा निषेध करतो. आयोजकांना या महिलेले येथे आमंत्रित करायला नको होते. जर मला याची कल्पना असती तर मी येथे आलो नसतो. आपण भारतासाठी आहोत आणि आपण पाकिस्तानचे समर्थन करत नाही. आपला पूर्ण प्रयत्न भारत वाचवण्यासाठी आहे.

जेडीएसचे नेता इमरान पाशा यांनी दावा केली की या महिलेला एखाद्या विरोधी समूहाने आयोजनात बाधा आणण्यासाठी पाठवले. ते म्हणाले की महिला वक्त्यांच्या यादीत समाविष्ट नव्हती आणि पोलिसांकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

You might also like