धक्कादायक ! पुणे जिल्ह्यात पती-पत्नीस लुटून महिलेवर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-सोलापूर महामार्गावरील सर्व्हिस रस्त्याने दुचाकीवरून जाणाऱ्या पती पत्नीला बंडगरवाडीजवळ लुटमार करीत तिघा चोरट्यांनी पत्नीवर बलात्कार करण्याचा प्रकार घडला.
हा प्रकार पती पत्नी दुचाकीवरुन इंदापूरहून दौंड तालुक्यातील राजेगाव येथे जात असताना शनिवारी रात्री १० वाजण्याच्या दरम्यान बंडगरवाडीजवळ घडला.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, पती पत्नी त्यांच्या दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी बिल्ट कंपनीपासून काही अंतरावर सर्व्हिस रोडवरुन जात असताना एका मोटारसायकलवरुन तिघे जण आले. त्यांनी त्यांच्या गाडीला आडवे मारुन खाली पाडले. त्यानंतर महिला व तिच्या पतीला चाकूचा धाक दाखवित महिलेच्या अंगावरील सोन्याची झुबे फुले, मनीमंगळसूत्र तसेच महिलेच्या पतीच्या खिशातील रोख रक्कम मोबाईल असा ४७ हजार रुपयाचा ऐवज जबरीने हिसकावून घेतला.

यावेळी तिघातील एकाने महिलेला चाकूचा धाक दाखवीत बाजूला असणाऱ्या झुडूपात नेवून बलात्कार केला. या घटने नंतर आरोपी फरार झाले. यानंतर महिलेने पतीसह भिगवण पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like