अश्लिल फोटो काढून महिलेवर बलात्कार, खंडणीचा FIR दाखल

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन – महिलेचे अश्लिल फोटो काढून कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्याचा प्रकार मळवली येथे घडला आहे. दोघा आरोपींनी या फोटोच्या आधारे तिला धमकावून तिच्याकडून वेळोवेळी मोठी रक्कम उकळल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दोघांविरुद्ध बलात्कारासह खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ठाणे येथील एका ३८ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना एप्रिल ते १० ऑगस्ट २०१९ दरम्यान मळवली येथे घडली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी फिर्यादीचे नग्न अवस्थेतील काढलेले फोटो सचिन याला पाठविले. त्या फोटोचा व त्याचेबरोबर फोनवर झालेल्या मेसेजचा आधार घेऊन त्याने कोयत्याचा धाक दाखवून वेळोवेळी बलात्कार केला. तसेच पवनानगर येथे फिर्यादी व आरोपीचे सोबतचे एकत्र अर्धनग्न फोटो काढले. हे फोटो व मेसेज पतीला व मुलांना पाठवून देण्याची धमकी देऊन तिच्याकडून १५ हजार रुपये उकळले. तसेच लोणावळा येथील प्रथमेश मॉलमधून ३ हजार ५७६ रुपये घेतले. हे फोटो सोशल मिडियावर पाठविण्याची धमकी देऊन ५० हजार रुपयांची मागणी केली. तसेच मुलगी व पतीला फोनद्वारे धमकी दिली. त्यांच्या या अत्याचाराला कंटाळून शेवटी या महिलेने पोलिसांकडे धाव घेतली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त-

You might also like