धक्कादायक ! उत्तर प्रदेशात धावत्या बसमध्ये महिलेवर बलात्कार

नोएडा : वृत्तसंस्था – धावत्या बसमध्ये बस चालकाने महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशात उघडकीस आला आहे. पीडित महिला प्रतापगडहून नोयडाला बसमधून जात होती. त्यावेळी चालकाने तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून बस चालकाला अटक केली असून बस देखील पोलिसांनी जप्त केली आहे. तर बस चालकाचा साथिदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

प्रतापगड येथील महिला आपल्या दोन मुलांसोबत गौतम बुद्ध नगर येते जात होती. प्रतापगड येथून मंगळवारी रात्री ती एका डिलक्स बसमध्ये बसली. बसचालकाने धावत्या बसमध्ये बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेने चालकाला प्रतिकार केला असता तिला बसमधील सहचालकाने धमकावले असे तिने सांगितले, अशी माहिती पोलीस उपायुक्त वृंदा शुक्ला यांनी दिली आहे.

घटनेनंतर आरोपीने पीडित महिलेला सेक्टर 27 मधील एका रुग्णालयाजवळ बुधवारी सकाळी सोडून फरार झाला, असे या महिलेन पोलिसांना सांगितले. ही महिला बसमधील सर्वात मागील आसनावर बसली होती. रात्रीची वेळ असल्याने इतर प्रवासी झोपले होते. त्यामुळे त्यांना या घटनेबाबत काहीही माहिती नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या महिलेला रुग्णालयात नेऊन तिची वैद्यकीय तपासणी केली. तसेच बसचालकाला अटक करण्यात आली असून त्याचा साथिदार अद्याप पसार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नेमकं काय घडलं ?
मंगळवारी संध्याकाळी पीडित महिला ही नोएडा येथे जाण्यासाठी प्रतापगड येथून एका खासगी डबल डेकर मध्ये चढली. त्यावेळी तिच्यासोबत दोन मुलेही होती. तिचा पती नोएडा येथे नोकरी करतो. बसमध्ये ती मुलांसह फ्रंट स्लीपर सीटवर बसली होती. साधारण आठच्या सुमारास सहचालक आणि वाहकाने तिच्याकडे सीटसाठी 500 रुपयांची मागणी केली. अन्यथा सिट खाली करा असे सांगितले. मात्र नोएडाला पोहचल्यानंतर पैसे देईन असे सांगितल्यानंतर त्यांनी लगेच पैसे द्या असा आग्रह धरला.

अखेर महिलेने आपल्या दोन मुलांना घेऊन बसच्या मागील सीटवर जाऊन बसली. अचानक तिला आणि मुलांना झोप लागली. पहाटे साडेतीनच्या सुमारास जाग आली त्यावेळी बसमधील सहचालक तिच्याजवळ झोपला होता. ते पाहून आरडाओरडा करत असताना त्याने ओढणीने तिचे तोंड बांधून तिला धमकावले. त्यामुळे ती महिला गप्प बसली. तिची दोन्ही मुले झोपली होती. घटना घडली त्यावेळी बसमधील इतर प्रवासी झोपलेले होते. सहचालकाने महिलेला पैसे घे आणि गप्प बस अशी धमकी दिली. तसेच हे प्रकरण मिटवून घेण्यास सांगितले.