आश्चर्यकारक ! तिनं तब्बल 20 वर्षांपासून पाहिला नाही ‘सूर्य’, हे कसलं जीवन ?

रबात : पोलीसनामा ऑनलाईन –    एका महिलेने 20 वर्षांपासुन सूर्य पाहिलेला नाही, तरीही ती जीवन जगत आहे. होय, आश्चर्य वाटले ना…? पण, हे वास्तव आहे. एका महिलेला संपूर्ण आयु्ष्य अंतराळवीरांसारखे हेल्मेट वापरून जगावे लागत आहे. ही महिला उन्हात गेल्यास तिचा मृत्यू ओढावेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. मोरक्कोमध्ये राहणार्‍या महिलेचे नाव फातिमा घाजेवी असे आहे.

फातिमा घाजेवी या महिलेला अतिशय दुर्मिळ आजार आहे. जिथे लोक जीवनसत्त्व घेण्यासाठी सूर्यप्रकाशात उभे राहतात. मात्र, फातिमासाठी उन्हात जाणेही तिच्या जीवितास धोकादायक आहे.

याबाबत ‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तानुसार, मोरक्कोतील मोहम्मदीया शहरातील 28 वर्षांची फातिमा गेल्या 20 वर्षात कधीही हेल्मेटशिवाय घराबाहेर पडली नाही.

फातिमाला एक दुर्मिळ त्वचा विकार असून या आजाराला जेरोडेरमा पिग्मेंतोसमअसे म्हटले जात आहे. हा आजार जनुकीय असून यामध्ये त्वचेवरील पेशी स्वत: हून पुन्हा विकसित होत नाहीत. त्यामुळे उन्हात जाणे आणि अल्ट्राव्हाल्ट किरणांच्या संपर्कामध्ये आल्यामुळे त्वचेचे नुकसान होते. हे नुकसान कधीही न भरून येणारे आहे.

या परिस्थितीत फातिमाला काही दिवसांत त्वचेचा अथवा डोळ्यांचा कर्करोग होऊ शकतो, असेही सांगण्यात आले आहे. मागील 20 वर्षांपासून एकदाही उन्हात गेली नाही, असेही फातिमाने सांगितले आहे.

या आजारामुळे फातिमाचे आयुष्य बदलून गेले आहे. सूर्यास्तानंतर तिचा दिवस सुरू होतो. दररोज दिवसभर फातिमा झोपून राहते. अन् रात्री घराबाहेर पडते.

घराबाहेर पडताना तिला मास्क आणि ग्लोव्हज घालते. तिचा मास्क स्पेस सूटसारखा आहे. त्यामुळे फातिमानेच त्याचे नाव ’नासा मास्क’ असे ठेवले आहे. आभाळ भरून आल्यानंतरही तिला मास्कशिवाय घराबाहेर पडता येत नाही.

फातिमाने वयाच्या 13 व्या वर्षापर्यंत शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने आपले शिक्षण घरातून पूर्ण केले आहे.

अनेक आजार हे जनुकीय घटकामुळे होत असतात. हे आजार सुरूवातीला काही वर्षे पहायला मिळत नाही. कालांतराने त्याचे परिणाम दिसू लागतात. त्यामुळे अशा आजारांबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरते.

वैज्ञानिक द्ष्टीकोन बाळगून राहिल्यास अशा व्यक्तींना आपले जीवन जगता येते. मात्र, काही बाबींचा त्यांना त्याग करावा लागतो. सामान्य लोकांप्रमाणे नसले तरी जीवन जगण्यासाठी त्यांना आपले जीवन वेगळ्या पध्दतीचा अवलंब करावा लागतो.