तुरुंगात असलेल्या पतीसोबत शरीरसंबंधांची परवानगी द्या; महिलेची कोर्टात याचिका !

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  हरियाणाच्या कोर्टात एक केस दाखल करण्यात आली आहे ज्यात गुरुग्रामच्या एका महिलेनं तुरुंगात असणाऱ्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी मागितली आहे. तुरुंगात असलेल्या व्यक्तीला वंश वाढवण्यापासून रोखलं जाऊ शकत नाही असं महिलेनं म्हटलं आहे. दरम्यान हायकोर्टानं गृह विभागाकडून याचं उत्तर मागितलं आहे.

हत्या आणि इतर गुन्ह्यात दोषी आहे पती

ज्या महिलेनं कोर्टात याचिका दाखल केली आहे तिनं सांगितलं की, तिच्या पतीला गुरुग्राम कोर्टानं हत्या आणि इतर गुन्ह्यात दोषी ठरवलं आहे. 2018 पासून पती भोंडसी जिल्हा तुरुगांत बंद आहे. पत्नीनं आपल्या याचिकेत सांगितलं की, तिला अपत्य हवं आहे. यासाठी तिला पतीसोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत.

महिलेच्या वकिलानं सांगितलं की, मानवाधिकारांनुसार, महिलेला वंशवृद्धीचा अधिकार आहे. त्यांच्याकडून सांगण्यात आलं की, संविधानाच्या आर्टीकल 21 नुसार त्यांना जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार आहे.

कोर्टानं मागितलं सरकारकडून उत्तर

जसवीर सिंहच्या एका केसचा निपटारा करत हायकोर्टानं पंजाब सरकारला कैद्यांना वंशवृद्धीसाठी पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवण्याबाबत नीति बनवण्यास सांगितलं होतं. कोर्टानं हरियाणाच्या अ‍ॅडिशनल अ‍ॅडव्होकेट जनरलला विचारलं होतं की, राज्य सरकारनं जसवीर सिंह केसमध्ये हायकोर्टाच्या आदेशावरून अशाच प्रकराची काही नीति तयार केली आहे काय.