धक्कादायक ! बीलावरुन ‘कोरोना’मुक्त महिलेला पती आणि मुलीकडून मारहाण, चाकूनं केला हल्ला, FIR दाखल

छिंदवाडा : वृत्तसंस्था – देशात कोरोना (corona) बाधितांवर रुग्णालयात उपचार केले जात आहे. कोरोनामुक्त झालेल्या लोकांचे त्यांच्या परिवारातील लोक मोठ्या उत्साहात घरात स्वागत करतात. मात्र, मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. कोरोनामुक्त (corona)  होऊन घरी परतलेल्या महिलेला तिच्या पती आणि मुलीने मारहाण केली. एवढेच नाही तर तिच्यावर चाकूनं जीवघेणा हल्ला देखील केला आहे. याप्रकरणी महिलेने पती आणि मुलीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

शोभना पटौरिया असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पती संजय पटौरिया आणि मुलगी वंशिका पटौरिया असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पटौरिया कुटुंब छिंदवाडा येथील हॉटेल जे.पी. इनच्या मागील परिसरात वास्तव्यास आहे. शोभना यांना मे महिन्यात कोरोनाची बाधा झाली होती. कोरोनाशी दोन हात करुन 17 दिवसांनी शोभना या घरी परतल्या होत्या. घरी परतल्यानंतर पती आणि मुलीसोबत वाद झाला. या वादातून पती आणि मुलीने त्यांना मारहाण करत चाकू हल्ला केला.

कोरोनावर मात केल्यानंतर 17 दिवसांनी शोभना घरी परतल्या होत्या. यावेळी त्यांचा आणि पती संजय मुलगी वंशिका यांच्यासोबत उपचारासाठी झालेल्या खर्चावरुन वाद झाला. हा वाद एवढा टोकाला गेला की, पती आणि मुलीने त्यांच्यावर चाकुनं हल्ला केला, असा आरोप शोभना यांनी तक्रारीत केला आहे. दोघांनी आपल्यावर हल्ला केल्यानंतर आपला जीव वाचवून तेथून पळून गेले. कोरोनातून नुकत्याच बऱ्या झालेल्या शोभना यांनी ऑक्सिजन मास्क लावून पोलिस ठाणे गाठले. त्यांनी पती आणि मुलीविरोधात तक्रार दाखल केली.

शोभना यांनी पोलिसांना सांगितले की, मी कोरोनातून नुकतीच बरी झाले आहे. 16 ते 17 दिवसानंतर मी घरी गेले होते. त्यावेळी पती आणि मुलीनं उपचारांवर झालेल्या खर्चावरुन वाद घातला. पती आणि मुलीनं माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. मी तिथून कशीबशी निसटले, असा जबाब शोभना यांनी नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करित आहेत.

Also Read This : 

पुणे-सोलापूर रस्त्यावरील प्रसिद्ध हॉटेल कांचनला भीषण आग

 

जर आपण पार्लरमध्ये जाऊ शकत नसाल तर घरी बसून करा Honey Facial, चेहर्‍यावर येईल Instant Glow

 

भारतीय हवामान खात्याचा सुधारीत अंदाज ! यंदा 101 टक्के पाऊस पडणार, जाणून घ्या कोणत्या भागात किती पाऊस

 

COVID-19 : कोरोनाची ‘सौम्य’ लक्षणे गंभीर संसर्गात बदलण्यापासून रोखण्यासाठी ‘या’ चुका टाळा, जाणून घ्या

 

रुसून माहेरी गेलेल्या पत्नीला धडा शिकवण्यासाठी पतीने केले असे काही की…

 

पाणी असणार्‍या ‘या’ 5 फळांचं नक्की सेवन करा, डिहायड्रेशनपासून वाचेल शरीर; जाणून घ्या