धक्‍कादायक ! आई घरात असताना देखील सावत्र बापाकडून मुलीवर बलात्कार, 3 वेळा केला गर्भपात

इंग्लंड : गेल्या काही वर्षांपासून महिलांवरील अत्याचारांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. हे अत्याचार दिवसेंदिवस क्रौर्याची परिसीमा गाठणारे ठरत आहेत. एका रिपोर्टनुसार स्त्रियांवर अत्याचार करणारे बहुतेक जण ओळखीचे, नातेवाईक, शेजारी असतात. अशी अनेक प्रकरणे दाबली जातात किंवा लाजेखातर लपवली जातात त्यामुळे तिथे कायद्याचा काहीएक उपयोग होत नाही. मात्र एका महिलेने स्वत:ची वेगळी ओळख जाहीर केली आणि सावत्र पिता तिच्यावर बलात्कार कसे करत आणि आईने हे सर्व माहित असूनही घटनेस अनुमती दिली हे उघड झाले. ही घटना इंग्लंडमधील मिल्टन किनेस येथे घडली. पीडित मुलगी केवळ 9 वर्षांची होती तेव्हाच हा लैंगिक हिंसाचार सुरु झाला. दरम्यान, तक्रारीनंतर ४४ वर्षीय सावत्र पिता एनोकी अँड्र्यू यांना लैंगिक गुन्ह्यांसाठी २० वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

इंग्लंडची वृत्तसंस्था डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, आता २८ वर्षांची राहेल ग्रेने म्हटले आहे की, वयाच्या नवव्या वर्षांपासून ७ वर्षे सावत्र वडिलांकडून तिचे लैंगिक शोषण केले गेले. यादरम्यान ती ३ वेळा गर्भवती झाली व तिला गर्भपात करावा लागला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, राहेलच्या आईने आपल्या मुलीची बाजू न घेता तिचे वर्णन ‘लबाड’ आणि ‘स्वार्थी’ म्हणून केले आहे.

मुलांबरोबर होणा-या हिंसाचाराच्या आरोपाखाली राहेलच्या आईलाही न्यायालयाने ५ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सावत्र पिता आणि आईला शिक्षा दिल्यानंतर रेचेलने एका मुलाखतीत सांगितले- ‘दोघेही आता तुरूंगात गेले आहेत, त्यामुळे मला सुरक्षित वाटते.’

राहेल म्हणाली की ती आपल्या आईकडून झालेली फसवणूक कधीही विसरू शकणार नाही. आता ती म्हणत आहे की इतर पीडितांपर्यंतही त्यांना न्याय मिळू शकेल हा संदेश पोहोचला पाहिजे.

राहेलने सांगितले की जेव्हा ती ४ वर्षांची होती, तेव्हा तिचे वडील तिच्या आईपासून विभक्त झाले. सन २००० मध्ये, आईने एनोकी नावाच्या माणसाला डेट करण्यास सुरवात केली. एनोकीला भेटून राहेलला खूप आनंद झाला. ५ महिन्यांनंतर, एनोकी आणि राहेलचे लग्न झाले. पण एनोकीने तिच्या लग्नाच्या एक आठवड्यापूर्वीच राहेलवर लैंगिक अत्याचार करण्यास सुरवात केली.

आरोग्यनामा ऑनलाइन –

You might also like