मृत्यूच्या दाढेतून ‘निष्पाप’ मुलाला वाचवलं, आईनं गमवले प्राण, घटना पाहून ‘थरकाप’ उडाला लोकांच्या काळजाचा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आग्रा येथील हायवे नजीक एक भयानक घटना घडली आहे. या ठिकाणी एक महिला ट्रकच्या तावडीत सापडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना इतकी भयानक होती की, पाहणारा प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत आहे. विशेष म्हणजे महिलेसोबत दीड वर्षांचा मुलगा देखील होता. ती आपल्या दिरासोबत बाईकवरून चालली होती अचानक बाईक घसरल्यामुळे तिघेही खाली पडले होते. बाईक खाली पडताच महिलेने आपल्या दिशेने येणार ट्रक पाहिला आणि हातातील लहान मुलांना रस्त्याने चालल्या वाटसरूंच्या दिशेने फेकले. ज्यामुळे मुलाचे प्राण वाचले. परंतु महिला ट्रकच्या तावडीत सापडली. घटनेनंतर हायवेवर ट्राफिक जाम झाले तर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.

अजयनाथ खजुआपुरा गावचा रहिवासी आहे. त्याची पत्नी उर्मिला (वय 27) सहा महिन्यांची गरोदर होती. शुक्रवारी दुपारी ती दिरासोबत औषध घेण्यासाठी आली होती. दुपारी 3:15 च्या सुमारास दुचाकीवरून घरी जाताना गर्दी होती त्यात नरेंद्रकडून दुचाकी घसरली.

उर्मिला आणि नरेंद्र रस्त्यावर पडले. उर्मिला सोबत दीड वर्षांचा मुलगा आयुष्य देखील होता. ट्रक मागून येत असल्याचे साक्षीदारांनी पोलिसांना सांगितले. ट्रक येत असल्याचे पाहून उर्मिलाने आपल्या मुलाला तेथून जाणाऱ्या लोकांकडे फेकले. एका वाटसरूने मुलाला पकडले.

उर्मिला ट्रकच्या तावडीत सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. परंतु नरेंद्र ट्रकच्या तावडीत येण्यापासून वाचला आणि घटनेनंतर हायवेवर मोठी गर्दी झाली होती ज्यामुळे ट्राफिक जाम देखील झाले होते. उर्मिलाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like