डेटवर गेलेल्या महिलेला मुलाकडून वाईट ‘अनुभव’, परत घेतले 1.6 लाख रूपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका 28 वर्षीय ब्रिटिश महिलेने डेट वर आलेल्या वाईट अनुभवांमुळे खर्च झालेली रक्कम परत मागितली. त्यानंतर या महिलेला जवळपास 1 लाख 6 हजार रुपये देखील मिळाले. मात्र हे पैसे ती ज्या व्यक्तींबरोबर डेटला गेली होती त्यांच्याकडून नव्हे तर अज्ञात व्यक्तींकडून मिळाले आहेत.

या महिलेने आपले खर्च झालेले हे पैसे परत मिळवण्यासाठी ऑनलाईन फंडिंग कॅम्पेन सुरु केले होते.  28 वर्षीय जाडे सेवेज हि महिला ज्या व्यक्तीबरोबर डेटला गेली होती, त्या व्यक्तीने तिच्याविषयी वाईट कमेंट केली होती. त्याचबरोबर आता ती अधिसारखी दिसत नसल्याचे देखील म्हटले होते. त्यामुळे तिने त्यावर खर्च झालेले सर्व पैसे परत मिळवण्यासाठी हि शक्कल लढवली. तिने सहजच GoFundMe यावर एक कॅम्पेन सुरु केले. त्यावर तिला 84 हजार रुपये देखील मिळाले. त्याचबरोबर एका वाईट अनुभवामुळेडेटवर जाणे बंद करणार नसल्याचे देखील तिने म्हटले आहे. त्याचबरोबर मी जशी आहे  त्यावर मी खूप खुश असल्याचे देखील तिने म्हटले.

दरम्यान, ती यातील काही रक्कम दान करणार असून अशाचप्रकारे वाईट अनुभव आलेल्या महिलांवर हि रक्कम खर्च करणार असल्याचे देखील तिने म्हटले. तसेच या सर्व प्रक्रियेमध्ये तिचे जवळपास 8 हजार रुपय खर्च झाले होते.

Visit : Policenama.com

You might also like