काय सांगता ! होय, 30 वर्षाच्या महिलेने 14 वर्षीय मुलासोबत जबरदस्तीने ठेवले संबंध, अशी झाली ‘पोलखोल’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – एका समुपदेशक महिलने चक्क तिच्यापेक्षा निम्या वयाच्या मुलाचे लैंगिक शोषण करून ती गर्भवती झाल्याचा धक्कादायक प्रकार अमेरिकेत उघडीकस आला आहे. सध्या या प्रकरणाची सोशल मिडियावर तुफान चर्चा होत आहे.

डेनिल हुक (वय 30) असे या महिलेचे नाव आहे. अमेरिकेतील आयोवा प्रांतातील सीडर रॅपिड्समध्ये राहणारी डेनिल हूक ही काऊन्सलर आहे. एका 14 वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण केल्यानंतर ती गर्भवती झाली. त्यानंतर तिने अल्पवयीन मुलाच्या बाळाला जन्मही दिला. तेंव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला. तोपर्यंत याबाबत कुणाला काहीच माहीत नव्हते. कोर्टात पीडितच्या वकिलांनी सांगितले की, लैंगिक शोषणानंतर डेनिलने बाळाला जन्म दिला. याचा खुलासा डीएनए टेस्टनंतर झाला. टेस्टमध्ये अल्पवयीन मुलाचा आणि नवजात बाळाचा डीएनए मॅच झाला आहे.

अल्पवयीन मुलाच्या लैंगिक शोषण प्रकरणी डेनिलला मार्च 2020 मध्ये पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तिला कोर्टात हजर केले होते. गेल्या बुधवारी तिला न्यायालयात दोषी ठरविण्यात आले. यापूर्वी महिलेने कोर्टात अल्पवयीन मुलासोबत लैंगिक शोषण केल्याप्रकरणी लिखित माफी मागितली होती. आयोवा डिपार्टमेंट ऑफ ह्यूमन सर्व्हिसनुसार, डेनिल हुकने 1 जुलै 2017 पासून 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केले आहे.