प्रेयसीला सोफ्याच्या खाली सापडला प्रियकराच्या विश्वासघाताचा ’पुरावा’, Facebook वर हृदय दुखावलेल्या प्रियेच्या वेदना Viral

नवी दिल्ली : प्रेमात विश्वासघात होण्याच्या वेदना केवळ तोच जाणू शकतो, जो यामधून जातो. कधीही आपल्या पार्टनरच्या विश्वासघाताचा पुरावा मिळणे चांगले नसते. त्यातही जर पुरावा या गोष्टीचा असेल की, पार्टनर आपल्या पाठीमागे कुणाला तरी घरी आणतो आणि तिच्यासोबत रोमान्स करतो, अशावेळी दु:खाची व्याप्ती आणखी वाढते. असेच काहीसे या महिलेच्या बाबतीत घडले होते. महिलेला आपल्या घरात सोफ्याच्या खालून विश्वासघाताचा पुरावाच मिळाला. प्लास्टिक-रबरच्या या पुराव्याला यूज्ड कंडोम समजून महिलेने फेसबुकवर शेयर केले, जेथून हे विचित्र प्रकरण वायरल झाले.

माहितीनुसार, या घटनेचा फोटो महिलेने गर्ल्समाऊथ नावाच्या फेसबुक पेजवर टाकला होता. हा एक प्रायव्हेट ग्रुप आहे, ज्याच्या पोस्ट केवळ मेंबर्स पाहू शकतात. याच गु्रपवर टाकलेल्या पोस्टचा स्क्रीनशॉट वायरल झाला आहे. महिलेने या पोस्टमध्ये एक छायाचित्र टाकले आहे, ज्यामध्ये तिने लिहिले की, मला वाटते माझा पार्टनर मला फसवत आहे. सोफ्याच्या खालून हा पुरावा सुद्धा मिळाला आहे. मात्र, मुलीने ज्यास युज्ड कंडोम समजले होते त्याचा फोटो पाहून लोकांना हसू आवरत नव्हते.

1 लाख 61 हजार लोकांनी उडवली थट्टा
कारण, ज्या वस्तूला महिलेने युज्ड कंडोम म्हटले होते ते प्रत्यक्षात चिकन सॉसेजचे कव्हर होते. ते दिसायला कंडोमप्रमाणेच असते. याने चिकन सॉसेजला बांधून स्टोअर केले जाते. लोकांनी जेव्हा पोस्ट पाहिली तेव्हा सर्वांना हसू आवरता आले नाही. ग्रुपमधील 1 लाख 61 हजार मेंबर्सने लिहिले की, यामध्ये चिंता करण्याची बाब नाही, हे असेही तिच्या प्रियकराला फिट नाही बसणार.

वायरल झाल्या मजेदार कमेंट्स
फसवणुकीच्या या घटनेचा खुलासा फोटोवरून झाला. सर्वांना समजले की, अखेर सत्य काय आहे. यानंतर मुलीला हायसे वाटले पण तोपर्यंत लोकांनी तिची भरपूर मस्करी केली होती. एका मेंबरने लिहिले की, ही तर सर्वात मोठी फसवणूक आहे की तिच्या प्रियकराने लपून सॉसेज खाल्ले. तर एकाने लिहिले, प्रियकर तर केवळ आपली भूक भागवत होता.