संतापजनक ! वर्षानुवर्ष ‘कैद’मध्ये राहिली सावत्र मुलगी, वडिलांच्या 8 मुलांना दिला जन्म

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वडीलांनीच आपल्या 11 वर्षांच्या सावत्र मुलीचे अपहरण केले आणि त्यानंतर तिला अनेक वर्ष कैदेत ठेवले. या दरम्यान सावत्र बापाने आपल्या मुलीची इच्छा नसताना तिच्याबरोबर लैगिक संबंध ठेवले आणि 8 मुलांना जन्म दिला. सावत्र वडिल्यांच्या कचाट्यातून सुटलेल्या मुलीने आता 3 वर्षांनंतर आपली कथा सार्वजनिक केली. अमेरिकेतील एका टीव्ही शोमध्ये या मुलीची मुलाखत घेण्यात आली.

एका वृत्तानुसार पीडित मुलीच्या आईला त्रास देण्याच्या हेतूने सावत्र वडीलांनी 1997 साली मुलीचे अपहरण केले होते. अमेरिकेच्या ओकलाहोमामध्ये राहणाऱ्या या मुलीचे अपहरण करुन मेक्सिकोमध्ये नेण्यात आले.

मेक्सिकोमध्ये सावत्र वडिलांनी जबरदस्तीने मुलीशी लग्न केले. त्यानंतर शारीरिक संबंध निर्माण करुन 8 मुलांना जन्म दिला. या दरम्यान तीला एका टेंटमध्ये ठेवण्यात आले होते जेणेकरुन ती तपासाला येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नजरेआड राहीलं.

2016 साली मुलीने आपल्या मुलांसह नराधमाच्या कचाट्यातून स्वताची सुटका करुन घेत अमेरिका दुतवासात पोहचली. पळून जात असताना काही अनोळखी व्यक्तीने देखील तिला मदत केली. या दरम्यान सावत्र वडिलांना अपहरणाप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले. बलात्काराच्या प्रकरणी देखील अजून न्यायालयाचा निर्णय येणे बाकी आहे.

असेच एक प्रकरण ऑस्ट्रियामध्ये देखील समोर आले होते. तेथे एका व्यक्तीने आपल्या मुलीला बऱ्यात काळासाठी कैदेत ठेवले होते. 24 वर्षांच्या दरम्यान मुलीने 7 मुलांना जन्म दिला होता.

Visit :  Policenama.com