रिलेशनशिपसाठी नकार दिल्याने केला हल्ला, महिलेच्या पोटात भोकसला चाकू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रविवारी मुंबईतील परेल येथील केईएम रुग्णालयाजवळ 37 वर्षांच्या महिलेवर तिच्या मित्राने चाकूने वार केले. भोईवाडा पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पीडित कविता आनंद कांबळे कोरोना सेंटरमध्ये करारावर काम करतात. रविवारी परेेल येथील रुग्णालयालगत बटलीवाला रोडवर राजेश काळे नावाच्या व्यक्तीनेे तिच्या पोटात चाकू भोकसला. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. असे म्हंटले जातेे की, कविताने राजेशला नकार दिला ज्यामुळे तो अस्वस्थ होता. कवितावर वार करण्यामागील हेच कारण असल्याचे मानले जाते.

अधिकाऱ्यांना संशय आहे की, कविता आणि आरोपी दोघेही पहिल्यांदा नात्यात होते परंतु त्या महिलेने त्याच्याशी संबंध संपवले ज्यामुळे राजेश काळेने ही घटना घडवून आणली. कवितावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला, तिला जवळच केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, या हल्ल्यात आरोपीही जखमी झाला आहे. या घटनेनंतर रहिवाश्यांनी पोलिसांच्या मदतीने राजेश काळेला पकडले. जखमी कविता आणि आरोपी काळेला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भोईवाडा पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नासह सर्व कलमांत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी गोवंडीची असून आरोपी मुंबईतील कुर्ला येथील आहे.