NRC यादीत नाव नसल्याची ‘अफवा’, महिलेनं विहीरीत उडी मारून जीव दिल्यानंतर ‘वास्तव’ समोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आसाममध्ये एनआरसीची अंतिम यादी जाहीर केली गेली आहे. गृहमंत्रालयाने आज सकाळी नागरिकांची अंतिम यादी जाहीर केली. तब्बल १९,०६,६५७ लोकांना अंतिम यादीतून वगळण्यात आले आहे. बरेच लोक या यादीवर समाधानी नाहीत. दरम्यान, ६० वर्षांच्या महिलेने यादीत नाव नसल्याचे ऐकून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. नंतर चौकशी केली असता मात्र यादीत त्यांचे नाव समाविष्ट झाल्याचे समोर आले आहे.

ही घटना उत्तर आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातील आहे. तेथे शनिवारी सकाळी ६० वर्षीय सयारा बेगम यांनी विहिरीत उडी मारली कारण कोणीतरी तिला सांगितले की तिचे नाव यादीत नाही. तिला तात्काळ विहिरीतून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यांचा मृत्यू झाला. वास्तविक पाहता तोपर्यंत यादी पूर्णतः जाहीर झाली नव्हती त्यामुळे महिलेचे नाव होते की नाही याबाबत केवळ अनिश्चितता होती.

मिळालेल्या वृत्तानुसार, महिलेचे पती शमशेर अली यांनी सांगितले की एनआरसीच्या अंतिम यादीमध्ये नाव असेल की नाही याबाबत कालपासून त्यांचे कुटुंब खूप खूप ताणतणाव आहे. याआधी ३० जुलै २०१८ रोजी प्रसिद्ध जाहीर झालेल्या एनआरसी यादीमध्ये महिलेच्या नवरा आणि तिची दोन मुले यांची नावे नव्हती, मात्र तिचे स्वतःचे नाव त्यात समाविष्ट होते.

आज पुन्हा जाहीर होणाऱ्या अंतिम या यादीमध्ये तिचे नाव नसेल या भीतीने ती प्रचंड तणावाखाली होती आणि कोणीतरी नाव नसल्याचे सांगितल्यावर मात्र तिला तणाव सहन न झाल्याने तिने विहिरीत उडी मारल्याचे तिचा नवरा अली यांनी सांगितले. एनआरसीच्या अंतिम यादीमध्ये आपल्या आणि आपल्या मुलांची नावे समाविष्ट असल्याचे अलीने स्पष्ट केले, परंतु पत्नीने हे शोधण्यापूर्वीच आत्महत्या केली.

दरम्यान, एनआरसीचे स्टेट कॉर्डिनेटर प्रतिक हजेला यांनी सांगितले की एनआरसीच्या अंतिम यादीमध्ये ३ कोटी ११ लाख २१ हजार लोकांना स्थान मिळाले आहे आणि १९,०६,६५७ लोकांना वगळण्यात आले आहे. तथापि, ज्यांना यादीवर आक्षेप आहे ते फॉरनर्स ट्रिब्यूनल समोर अपील दाखल करू शकतात.

दरम्यान, लोकांचा असंतोष पाहून राज्यात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी ५१ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आसाम पोलिसांनी लोकांना अफवा पसरवू नये असे आवाहन केले आहे. याशिवाय ही यादी आल्यानंतर गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आसाममध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like