महिलेचा पोलीस ठाण्यासमोरच आत्महत्येचा प्रयत्न

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –   येथील एका महिलेने सांगली शहर पोलीस स्टेशनसमोरच विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अर्चना नामदेव जाधव (वय, २१ रा. जुना बुधगाव रोड, वाल्मिकी आवास) असे त्या महिलेचे नाव आहे. त्यावेळी तेथील बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी लगेच त्या महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर तिची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे.

अधिक माहिती अशी, त्या महिलेचा पती नामदेव जाधव याला चौकशीसाठी बोलावून पोलीस नाहक त्रास देत असल्याचा आरोप अर्चना जाधव यांनी केला आहे. पोलिसांच्या त्रासाला कंटाळून पती बेपत्ता झाल्याचा आरोपही त्या महिलेने केला आहे. तसेच, यावरून तेथील पोलिसांनी सर्व आरोप फेटाळत, संबंधित महिलेचा पती रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, त्याचे एका चोरीच्या गुन्ह्यात नाव निष्पन्न झाले आहे. त्याला आम्ही कोणताही त्रास दिलेला नाही. चोरीच्या गुन्ह्यात नाव निष्पन्न होताच तो पळून गेला असून, या गुन्ह्यातून वाचण्यासाठी हा प्रयत्न आहे. सांगली शहर पोलीस ठाण्याचे पीआय अजय सिंदकर यांनी दिली आहे.