6 फूट उंच असलेल्याकडून घेतलं ‘स्पर्म’, महिलेला जन्मला ‘बुटका’ मुलगा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आई होण्याची शेवटची संधी म्हणून एका 40 वर्षीय महिलेने एका सहा फूट उंच असलेल्या स्पर्म डोनरकडून स्पर्म घेतला. महिलेला अपेक्षा होती की तिचा मुलगा देखील ऊंच आणि गोरा जन्माला येईल यासाठी महिलेने आईवीएफ ट्रीटमेंट यशस्विरित्या पार पाडली. मात्र त्यानंतर आलेल्या प्रेगनन्सी रिपोर्टनुसार तीला समजले की तिचा मुलगा हा बटला अर्थात बुटका आहे आणि त्याला एकॉड्रोप्लासिया नावाचा आनुवंशिक आजार आहे. यामध्ये डोक्याचा आकार मोठा आणि बोटे लहान असतात.

मुलाच्या जन्मानंतर डॉक्टरांनी महिलेला सांगितले की, मुलगा चार फुटापेक्षा मोठा होऊ शकणार नाही आणि त्याच्या हात पायांचा आकार देखील छोटा असणार आहे. महिलां यामुळे खूप नाराज झाली आणि तिने स्पर्म बँकेविरोधात खटला दाखल केला. माझ्याप्रमाणे अजून कोणत्या महिलेला त्रास होऊ नये यासाठी हे पाऊल उचलत असल्याचे महिलेने सांगितले.

रुस मधील जिल्हा न्यायालयाने या स्पर्म बँकेला बंद करण्याचा आदेश दिला आहे. मात्र आमचे स्पर्म डोनर हे 46 कॉमन जेनेटिक आजाराच्या तपासण्या करून पात्र झाल्याचा दावा या स्पर्म बँकेने केला आहे. तसेच डॉक्टरांनी मात्र सांगितले की हे जरुरी नाही की स्पर्म मुळेच मुलगा बुटका जन्माला आला असेल.

Visit : Policenama.com