वाळूचा ट्रक अडवल्याने महिला तलाठीला मारहाण; भाजप नगरसेवकाविरोधात FIR दाखल

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – वाळूचा ट्रक sand truck अडवल्याने भाजप नगरसेवकाने महिला तलाठीला शिवीगाळ करत मारहाण केली आहे. नंदूरबार जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी संबधित नगरसेवकांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपी नगरसेवकाला अटक करावी या मागणीसाठी महिला तलाठ्यासह अन्य अधिकारी पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते.

या प्रकरणी तलाठी निशा पावरा यांनी नंदूरबार शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार नंदूरबारमधील भाजप नगरसेवक गौरव चौधरी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांच्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाकडे गुजरातहून महाराष्ट्रात वाळू वाहतूक करण्यासंबंधिचा परवाना नव्हता.
त्यामुळे तलाठी निशा पावरा यांनी वाळूचा ट्रक दोन तास अडवला होता.
दरम्यान चालकाने वाळूचा ट्रक sand truck पळवून नेण्याचाही प्रयत्न केला.
त्यामुळे तलाठी यांनी आपल्या अन्य दोन सहकारी महिलांसोबत पाठलाग करून हा ट्रक पकडला. घटनेची माहिती मिळताच ट्रकचे मालक नगरसेवक गौरव चौधरी घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी महिला तलाठ्यांसोबत वाद घालायला सुरुवात केली.
त्यानंतर चौधरी यांनी तलाठी निशा पावरा यांना मारहाण केली.
या घटनेनंतर तलाठी आणि अन्य अधिकाऱ्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात जाऊन नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

READ ALSO THIS :

Lockdown in Pune : …म्हणून पुण्याची तिसर्‍या स्तरात घसरण

 

अभिनेते दिलीप कुमार हिंदुजा रुग्णालयात !
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ९८ वर्षांचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार Dilip Kumar यांना मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात Hinduja Hospital दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात Hinduja Hospital दाखल करण्यात आल्याची माहिती दिलीप कुमार Dilip Kumar यांच्या पत्नी अभिनेत्री सायरा बानू यांनी दिली आहे.

दिलीप कुमार Dilip Kumar यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रविवारी सकाळी ८ वाजता खार येथील हिंदुजा रुग्णालयात आणण्यात आले आहे.
त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दिलीप कुमार यांच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता आहे.
त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून दर महिन्याला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येतं.