‘लिव्ह-इन’ मध्ये राहणाऱ्या शिक्षिकेवर प्रियकराकडून अत्याचार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – मित्राच्या माध्यमातून झालेली ओळख प्रेमसंबंधात बदलली आणि दोघे ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ मध्ये राहू लागले. त्यांचे हे लिव्ह-इन नाते तब्बल आठ वर्ष चालले परंतु जेव्हा प्रियसीने प्रियकरा सोबत लग्न करायचे ठरवले तेव्हा मात्र त्या प्रियकराने लग्नास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या प्रियसीने पोलिसांना तिच्या प्रियकराच्या विरोधात बलात्कार केल्याची तक्रार नोंदवली आहे.

तक्रार नोंदवणारी महिला हि पेशाने शिक्षिका असून ती नागपूरच्या नंदनवन भागाची रहिवाशी आहे. तसेच ती नागपूरच्या नामांकित शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करत आहे. आरोपी सौरभ सिंह याच्याशी या महिलेची मित्राच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर त्या दोघांचे प्रेमसंबंध सुरु झाले. आरोपीने मध्य प्रदेशातून नागपूरला येऊन संबधित शिक्षिके सोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ मध्ये राहणे सुरु केले.

दरम्यान, लग्नाचे आमिष दाखवून आठ वर्ष लैंगिक शोषण केल्याचे त्या महिलेने आपल्या तक्रारीत म्हणले आहे. लग्नासाठी संबधित महिला आपल्या प्रियकराला सारखी तगादा लावू लागली या बाबीवरून त्यांच्यात खूपदा भांडणे झाली आणि एक दिवस तो अचानक मध्य प्रदेशात निघून गेला. त्यानंतर त्या महिलेने वारंवर आपल्या प्रियकराला फोन करून माघारी येण्याबद्दल विनंती केली परंतु तो प्रियकर माघारी आला नाही. या सर्व त्रासाला कंटाळून चिडलेल्या महिलेने आपल्या प्रियकरावर नंदनवन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद केला आहे.