यवतमाळ : पाण्याच्या टाकीत उडी घेऊन शिक्षिकेची आत्महत्या

यवतमाळ : पोटाच्या आजाराला कंटाळून जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेने घराच्या स्लॅबवरील पाण्याच्या टाकीत उडी घेऊन आत्महत्या केली. वैशाली दशरथ विधाते असे या शिक्षिकेचे नाव आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यामधील मुकूटबन येथे ही घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजता घडली. गेल्या अनेक महिन्यांपासून वैशाली विधाते या पोटाच्या आजाराने त्रस्त होत्या. अनेक डॉक्टरांकडे उपचार करुनही त्यांना आराम पडत नव्हता. या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. वणी पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली असून पुढील तपास करण्यात येत आहे.