‘तो’ तिला सतत म्हणायचा ‘I LOVE YOU’ तिने डायरेक्ट त्यालाच उचलले!

हैद्राबाद : वृत्तसंस्था – एकतर्फी प्रेमातून तरुणींचे अपहरण केल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या आणि पहिल्या असतील मात्र एका तरुणीने एकतर्फी प्रेमातून त्रास देणाऱ्या रोमियोचेच अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही २४ वर्षीय तरुणी सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तिला तरुणाचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, एक तरुण गेल्या काही दिवसांपासून या तरुणीसोबत फोनवर मेसेज पाठवून आणि तिला वारंवार फोन करून ‘I LOVE YOU’ असं म्हणायचा. यावर तरुणीने त्याला अनेक वेळा विरोध केला. पण तो काही ऐकायचा नाही. त्यामुळे रागात तरुणीने त्याचं अपहरण केलं.

तरुणीला त्याने पहिल्यांदा त्याच्या मित्राच्या घरी पाहिलं होतं. जिथे तो कारपेंटरचं काम करण्यासाठी गेला होता. आणि त्यातूनच त्याने तिचा नंबर घेतला. त्यानंतर तिला वारंवार फोन करून त्रास देण्यास सुरुवात केली. त्याच्या या त्रासाला कंटाळून या मुलीने या तरुणाला धडा शिकवण्याचे ठरवले.

त्यानंतर आपल्या मित्रसोबाबत तिने त्या तरुणाच्या अपहरणाचा कट केला. त्यानंतर एका कॉलेजच्या परिसरातून त्रास देणाऱ्या तरुणाचे अपहरण केले. त्याचं अपहरण करून तरुणी आणि तिच्या मित्रांकडून त्याला बेदम मारहाण करण्यात आली.पण त्यांच्या तावडीतून पळून जाण्यासाठी तो यशस्वी झालाआणि या तरुणीचा प्लॅन फिस्कटला. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी या तरुणाच्या अपहरणाप्रकरणी तरुणीला ताब्यात घेतले आहे.