संतापजनक ! १६ दिवसाच्या चिमुकलीचा आईनेच फेकले नाल्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नवजात बालकं रडतच असतात. त्यांचं रडणं थांबावं म्हणून आई अनेक उपाय करते. त्याला ऱ्ह्यदयाला कवटाळते. परंतु, मुंबईतील एका निर्दयी मातेने सतत रडते म्हणून आपल्या १६ दिवसांच्या चिमुलकलीला चक्क घरामागील नाल्यात फेकून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिला अटक केली आहे. समा नदीम अन्सारी (२५) असे महिलेचे नाव आहे.

समा आणि नदीम हे जोडपं सायनच्या मदिना मशि‍दीजवळ राहण्यास आहे. नदीम फर्निचर तयार करण्याचे काम करतो. दोघांचे एका वर्षापुर्वी लग्न झाले. समाने नुकताच एका मुलीला जन्म दिला. त्यामुळे घरात प्रचंड आनंदाचे वातावरण होते. मात्र १६ दिवसांची मुलगी वारंवार रडते म्हणून समाला राग आला होता. ती सतत रडत असल्याच्या रागातून समाने गुरुवारी तिने मुलीला घरामागील नाल्यात फेकून दिले. त्यानंतर चूक लक्षात आल्यावर तिचे अपहरण झाल्याचा बनाव तिने रचला. परंतु सर्वत्र शोध घेतल्यावर मुलगी घरामागील नाल्यात सापडली. मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिचा मृत्यू झाला होता. नदीमने याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दिली. त्याप्रमाणे अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.मुलीला झोपवून शौचालयासाठी गेलेली असताना तिचे अपहरण झाल्याचे समाने सांगितले. परंतु समाने दिलेल्या माहितीबाबत पोलिसांना दाट संशय आला. त्यामुळे पोलिसांनी तिला आडवे तिडवे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तेव्हा तिचा भावनेचा बांध फुटला आणि मुलीच्या हत्येची कबूली दिली.