मास्क घातला नाही म्हणून महिलेने तरुणाच्या चेहऱ्यावर फेकली गरम कॉफी (व्हिडीओ)

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूने हाहा:कार माजवला असून जगभरात कोरोना विषाणूमुळे संक्रमीत झालेल्या रुग्णांची संख्या 1 कोटी 80 लाख 51 हजार 553 इतकी झाली आहे. त्यापैकी 6 लाख 89 हजार 476 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1 कोटी 13 लाख 48 हजार 348 रुग्ण बरे झाले आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा अधिक असला तरी अद्याप कोरोना नष्ट झालेला नाही. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमानुसार प्रत्येकाने मास्क घालणे आणि दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवणे गरजेचे आहे. मात्र अद्यापही काही जण तोंडावर मास्क न घालताच फिरताना पहायला मिळत आहेत. अशाच एका तरुणाला महिलेनं चांगलीच अद्दल घडवली आहे. या तरुणाला मास्क घालण्याची विनंती करूनही हा तरूण ऐकत नव्हता. यामुळे संतापलेल्या महिलेने चक्क गरम कॉफी या तरुणाच्या चेहऱ्यावर फेकली. कॅलिफोर्नियातील मॅनहॅटम बिच येथे हा प्रसंग घडला.

जगभरात कोरोनाचा फैलाव वाढत असताना अमेरिकेत सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या ही 47 लाख 64 हजार 588 इतकी झाली आहे. येथील मृतांची संख्या अधिक असूनही सर्वाधिक आहे. येथे 1 लाख 57 हजार 905 जणांचा मृत्यू झाला असून 23 लाख 63 हजार 165 रुग्ण बरे झाले आहेत. मृतांची संख्या अधिक असूनही अद्याप येथील काही नागरिक मास्क न घालताच घराबाहेर पडत आहेत.

मॅनहॅटन बिचवर एक व्यक्ती मास्क न घालता, एका कपलजवळ येऊन बसला. मास्क न घालण्याच्या त्याच्या भूमिकेचं तो जोरदार समर्थन करत होता. पण, थोड्याच वेळात त्या महिलेचा रागाचा पारा चढला अन् तिनं हातात असलेला गरम कॉफिचा ग्लास त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर ओतला. त्यानंतर त्या व्यक्तीने जे केले ते अधिक निंदनीय होतं.