आश्‍चर्यम् ! अपघातानंतर तब्बल 6 दिवस कारमध्ये अडकली होती महिला, केवळ पावसामुळं वाचली

बेल्जियम : वृत्तसंस्था – एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला आणि तो त्यात अडकून राहिला तर जिवंत राहिलच असे नाही. अनेकदा तर लोकांचा त्यातच जीव जाऊ शकतो. मात्र बेल्जियममध्ये अशाच एका भीषण अपघातात जखमी झाल्यानंतर तब्बल ६ दिवस कारमध्ये अडकून पडली होती. तिला या कारमधून बाहेरही निघता येत नव्हते. या सहा दिवसांत ती फक्त पावसाच्या पाण्यामुळे जगु शकली. ही घटना बेल्जियममधी लीज येथील आहे.

अपघात ग्रस्त महिलेचे नाव कोरिन बेस्टाइड असून त्या ४५ वर्षांच्या होत्या. कोरिन यांची कारला घणदाट जंगलामध्ये अपघात झाला होता. अपघातात या महिला गाडीत अडकून पडल्या होत्या. त्यांच्या पाठीच्या कण्याच्या हड्डांना मार बसला होता. त्यामुळे त्यांना गाडीतून बाहेरही निघता येत नव्हते. मात्र त्या शुद्धीत होत्या. त्यानंतर त्यांनी आपल्या पायांनी गाडीचा दरवाजा उघडला. त्यानंतर ६ दिवस त्यांनी पावसांच्या पाण्यावर आयुष्य काढले.

२३ जुलैला या महिलेच्या कारला अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना कोणीच वाचवायला येणार नाही. त्यांचा दुर्दैवी अंत होणार असं त्यांना वाटू लागले होते. मात्र रेस्क्यू टीमने त्यांना शोधून काढले आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले. सध्या त्या नीट असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

आरोग्यविषयक वृत्त