बापरे ! अति मोबाइल वापरणं असं पडलं महागात, तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं

पोलिसनामा ऑनलाइन – अति मोबाइल वापराचे कोणकोणते परिणाम होऊ शकतात, याचा एक धक्कादायक प्रकार आयरलँडमधून समोर आला आहे. येथे एका महिलेने फोनचा अति वापर केल्याने तिला हात कापावा लागला आहे. फोनवर जास्त वेळ टाइप केल्याने तिच्या हाताची अशी स्थिती झाले. आपल्यावर ओढावलेला हा प्रसंग अन्य कुणावरही येऊ नये म्हणून तिने लोकांना जागरूक करण्यासाठी हा प्रकारे सोशल मीडियावर शेअर केलाय.

नोव्हेंबर 2018 मध्ये अति मोबाइल वापरामुळे 35 वर्षीय एमी लोरीच्या हातावर सूज आली. तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. ही सूज एक वर्षापर्यंत तिच्या हातावर होती. जेव्हा एमी डॉक्टरांना भेटली तेव्हा एमीची बायोप्सी केल्यानंतर तिला कॅन्सर असल्याचे निदान झाले.

कॅन्सर तिच्या हातातून संपूर्ण शरीरात पसरत असल्याचे डॉक्टरांनी तिला सांगितले. यामुळे जीव वाचवण्यासाठी एमीला हात कापावा लागला. एमीने सोशल मीडियावर लिहिले आहे की, तो काळ फार कठिण होता. रोज सकाळी जेव्हा ती झोपेतून उठत होती तेव्हा कापलेला हात पाहून रडत होती. सुरूवातीला ती आणि तिचा पती यावरून गंमत करत होते की, फोनवरून जास्त चॅटींग करून तिची अशी स्थिती झाली. पण दोघांनाही याची कल्पना नव्हती की, हे कॅन्सरचं लक्षण आहे.

सर्जरीनंतर आता एमी प्रत्येक कामासाठी पतीवर अवलंबून आहे. एमी म्हणाली, माझ्यासाठी हा फार मोठा धक्का होता. यातून बाहेर येण्यासाठीही खुप वेळ लागला.