झेब्रा क्रॉसिंगवरुन रस्ता ओलाडणाऱ्या महिलेचा डंपरच्या धडकेत मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यामध्ये झेब्रा क्रॉसिंगवरुन चालणे देखील अवघड झाले आहे. वाहतूकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांमुळे रस्त्याने पायी जाणाऱ्या, रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. काल (शनिवार) सकाळी साडे आठच्या सुमरास झेब्रा क्रॉसिंगवरुन रस्ता ओलांडणाऱ्या एका ६५ महिलेला भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरची धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन महिलेचा मृत्यू झाला. ही घटना खराडी येथील पुणे मनपा सरकारी दवाखान्यासमोरील रस्त्यावर घडली.

१७ कैद्यांचा कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’455f56c2-cfbb-11e8-9a59-65584da7b6c2′]

सरस्वती काळुराम कोद्रे (वय-६५ रा. गांधी चौक, मुंढवा) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मुकेश किसन पवार (वय-४३ रा. वाघेश्वरनगर, विटकर चाळ, वाघोली) याला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. तर बाळकृष्ण गवते (वय-६५ रा. केशवनगर मुंढवा) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

[amazon_link asins=’B01M0JSAFU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4d8bede7-cfbb-11e8-b36a-afcd7f3fae5e’]

फिर्यादी गवते हे आपल्या दुचाकीवरुन मुलाल भेटण्यासाठी जात होते. त्यावेळी रेसिसन चौकातील सिग्नलला ते थांबले होते. त्यावेळी सरस्वती कोद्रे या झेब्रा क्रॉसिंगवरुन रस्ता ओलांडत होत्या. मुंढवाकडून खराडी बायबासकडे येणाऱ्या भरधाव वेगातील डंपरची धडक सरस्वती कोद्रे यांना बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर डंपर चालक घटनास्थळी न थांबता निघून गेला. घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीचा शोध घेऊन अटक केली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक करित आहेत.

[amazon_link asins=’B07D5P3QWP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’55594e70-cfbb-11e8-be05-f331b85fb155′]

वाहतूकीचे नियम न पाळल्यामुळे पुणे शहरात दररोज अनेक लहान मोठे अपघात होत असतात. वाहन चालकांना वाहतूकीची शिस्त लागावी यासाठी वाहतूक पोलिसांकडून अनेक उपाय योजना केल्या जातात. विशेष मोहिमा राबवून बेशिस्त वाहन चालकांकडून दंड वसूल केला जातो. मात्र, पोलिसांनी कितीही प्रयत्न केले तरी बेशिस्त वाहन चालकांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. या बेशिस्त वाहन चालकांला कडक शासन करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.