जुण्या घराच्या वादातून रेडणी येथिल महीला व कुटुंबाला जबर मारहाण

इंदापूर : पाेलीसनामा ऑनलाईन

सुधाकर बोराटे

रेडणी ता. इंदापूर येथिल गेल्या आनेक वर्षापासुन गायरान जमिनित असलेले फिर्यादीचे घर पोकलेनच्या सहाय्याने पाडू न दिल्याने रेडणी ( पाटील वस्ती ) येथिल एकाच कुटुंबातील बारा ते पंधरा जनांना जमाव जमवुन हाताने लाथा बुक्या, काठ्या,लोखंडी पाईपने जबर मारहाण केल्याने एका महीलेचा पाय फ्रॅक्चर करून दोनजनांना गंभिर जखमी केले तर दोन महीलांचा विनयभंग करून बारा ते पंधरा जणांना जखमी केल्याची फीर्याद सौ. बायडाबाई किसन पिसाळ यांनी इंदापूर पोलीसात दाखल केली आहे.
[amazon_link asins=’B078124279,B072SWSQ1F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’730ba659-bc0d-11e8-b8c3-0d7d07b706db’]

दिनांक १८ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ७:४५ वाजताचे सुमारास रेडणी ( पाटीलवस्ती ) येथिल गायरान जमीनीत फिर्यादी सौ. बायडाबाई किसन पिसाळ वय. वर्षे ४०. यांचे मालकीचे असणारे जुणे घर पोकलेनच्या सहाय्याने पाडून टाकण्यासाठी आरोपी माणिक सदाशिव तरंगे, ज्ञानदेव सदाशिव तरंगे, हणूमंत भाऊसाहेब तरंगे, रणजित भाऊसाहेब तरंगे, यांचेसह बाहेरगावचे वीस ते पंचवीस लोकांनी जमाव गोळा करून फिर्यादी यांचे घराजवळ जमा झाले. त्यावेळी आरोपी यांना घर पाडण्यास फिर्यादी यांनी हरकत घेतली असता आरोपी व त्यांनी जमा केलेल्या वीस ते पंचवीस जनांच्या जमावाने फिर्यादी बायडाबाई पिसाळ यांना मारहान करण्यास सुरूवात केली. त्या वेळी बायडाबाई यांना वाचविण्यासाठी घरातील लोक आले असता अगोदरच भांडणे करण्याच्या तयारीत असणार्‍या आरोपिंनी फिर्यादीच्या घरातील सर्वांनाच मारहान करण्यास सुरूवात केली.

यामध्ये आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी करून लाथा बूक्य्या, लोखंडी पाईपने मारहाण करण्यास सुरूवात केली. यामध्ये चांगुणाबाई बळवंत पिसाळ यांचा डावा पाय फ्रॅक्चर करण्यात झाला आहे. शिवाजी मारूती पिसाळ. वय. वर्षे ५० व किसन मारूती पिसाळ.वय. वर्षे. ५५ हे डोक्यात मार लागल्याने गंभिर जखमी झाले. तसेच फिर्यादीची जाऊ शोभा शिवाजी पिसाळ, भामाबाई नवनाथ पिसाळ, या महीलांना गंभीर जखमी करून वीनयभंग करण्यात आला आहे. तर नवनाथ पिसाळ, नितीन पिसाळ, गोरक्ष पिसाळ, दिपक पिसाळ, राहूल पिसाळ, अजित तरंगे, यांना मारहान करून जखमी व दुखापत करून दोन महीलांचा विनयभंग केल्याची फिर्याद सौ.बायडाबाई किसन पिसाळ यांनी इंदापूर पोलीसात दाखल केली आहे.
[amazon_link asins=’B06Y5L25M4,B077L2N6M9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7c0f3cce-bc0d-11e8-b68a-a71903fc850e’]

यामध्ये फिर्यादीनां मारहान करण्यासाठी व गुंडा गर्दी करण्यासाठी आरोपी माणीक सदाशिव तरंगे यांनी बाहेरगावहून काही नातेवाईकांना बोलावुन घेवुन वीस ते पंचवीस जनांचा जमाव गोळा केला होता. यामध्ये ज्ञानदेव तरंगे, हणूमंत तरंगे, रणजित तरंगे, अजय तरंगे, नवनाथ तरंगे, भाऊसाहेब तरंगे, बाळासो तरंगे, सर्व रा. रेडणी. व सुरेश वायकुळे व त्याचा मोठा मुलगा, मोठ्या भावाचा मुलगा तीघे रा. सुरवड, ता. इंदापूर, उमेश मदनेचा भाऊ रा.अकलुज,ता. माळशिरस, माणीक तरंगे यांचे मावशिची दोन मुले, मेव्हना, मावस मेव्हणा, ज्ञानदेव तरंगे यांचा चुलत सासरा. रा. आढेगाव. ता. माढा,अमोल घाडगे रा. लाखेवाडी इत्यादी लोक आरोपींचा समावेश आसुन त्यांचे वीरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात भा.द. वि. कलम ३२४,३२६,१४३,१४७,१४८,१४९,३५४,३२५,५०४,५०६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आसुन पुढील तपास पोलिस नाईक नंदकुमार पिंगळे हे करत आहेत.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.