पतीने पाहिलेल्या स्वप्नामुळे ही महिला बनली 437 कोटींची मालकीन !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूच्या साथीमुळे एका महिलेला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते, परंतु त्याच्या काही दिवसानंतरच ती 437 कोटींची मालकिन बनली. कॅनडाच्या टोरोंटोमध्ये राहणाऱ्या या महिलेने लॉटरीमध्ये 60 मिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी रक्कम जिंकली. या महिलेचे नाव डेंग प्रातुदोम ( 57) आहे. डेंग प्रातुदोम सांगते की, 20 वर्षांपूर्वी तिच्या पतीने स्वप्न पहिले होते. स्वप्नात, लॉटरीची तिकिटे खरेदी करण्यासाठी त्याला विशिष्ट नंबरबद्दल माहिती मिळाली. या आकड्यांमुळे ही महिला 437 कोटी रुपये जिंकली.

दोन मुलांची आई, डेंग मागील 20 वर्षांपासून लॉटरीचे तिकिट खरेदी करत होती. प्रत्येक वेळी ती तिच्या पतीने स्वप्नात पाहिलेल्या क्रमांकाचेच तिकिट विकत घेत असत. दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महिलेला यश मिळाले. ओन्टरियो लॉटरी आणि कॅनडाच्या गेमिंगने डेंगच्या 437 कोटींच्या रुपये जिंकल्याची पुष्टी केली आहे. मनोरंजक गोष्ट म्हणजे लॉटरीमध्ये इतकी मोठी रक्कम जिंकण्याची माहिती स्वतः महिलेला पतीकडून मिळाली.

डेंगने सांगितले- ‘ 437 कोटी रुपये जिंकल्याची बातमी ऐकून मला खूप आनंद झाला आणि मी रडूही लागले. मला पहिल्यांदा विश्वास नव्हता. व्हर्च्युअल सेलिब्रेशन प्रोग्रॅममध्ये डेंग यांना हा धनादेश देण्यात आला. डेंगने सांगितले की, ती लॉटरीच्या पैशातून घर विकत घेणार आहे आणि मग संपूर्ण जग फिरून पैसे खर्च करेल. डेंग सुमारे 40 वर्षांपूर्वी 14 भावंडांसह अमेरिकेतल्या लाओसहून कॅनडाला आली होती. तिने सांगितले की, कुटुंबाच्या मदतीसाठी तिला आणि तिच्या पतीला खूप मेहनत घ्यावी लागत असे.