महिलेचं ‘डोक’ नसलेलं ‘धड’ सापडल्याने सर्वत्र खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – डोके धडापासून वेगळे करण्यात आलेला मृतदेह मिळाल्यानंतर मुंबईतील घाटकोपर भागात खळबळ उडाली आहे. हा मृतदेह एका महिलेचा आहे जो की पोत्यात भरून फेकलेला होता. महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

घाटकोपरच्या विद्याविहार भागात वाहणाऱ्या गटारात पडलेल्या पोत्यामधून प्रचंड वास येत होता. यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी ही पोती बाहेर काढली आणि जेव्हा ते बघितले तेव्हा सगळ्यांचे होश उडाले.

या पोत्यात एका महिलेचे धड सापडले आणि डोके गायब होते. यानंतर मृतदेहावर पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी पाठविले. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही, पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/