माजी आ. प्रा. मेधा कुलकर्णी व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जागतिक महिला दिनानिमित्त मोदीकेअरच्या टिम कोथरूडतर्फे प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ आयोजित केलेल्या जागो ग्राहक जागो या अनोख्या जनजागृती प्रदर्शनाचे उद्घाटन भाजपाच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते शनिवारी झाले.

woman's-day
सर्वसामान्य ग्राहकाला जागृत करण्याच्या उद्देशाने कोथरूड मधील महिलांच्या टीम कोथरुड या गटाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे प्रा. कुलकर्णी व मंजुश्री खर्डेकर यांनी कौतुक केले व अशा उपक्रमांसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. विविध उत्पादनांची माहिती घेतल्यानंतर रेडिएशनचे शरिरावर होणारे विपरित परिणाम दाखविणाऱ्या प्रात्यक्षिकातही त्या सहभागी झाल्या.

woman's-day