home page top 1

वीज कोसळून महिलेचा मृत्यू

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसात अंगावर वीज पडून एक शेतकरी महिला मृत्युमुखी पडल्याची घटना गुरुवार सायंकाळी साडेपाच वाजता दौंड तालुक्यातील भीमनगर शिवारात घडली.
रंजना महादेव धुमाळ (वय ५५ रा. भीमनगर, दौंड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

गुरुवारी सायंकाळी चार नंतर दौंड शहरासह राज्यातील अनेक भागात ढग जमून आले होते. यावेळी विजेचा कडकडाटासह काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यावेळी रंजना धुमाळ या आपल्या शेतामध्ये काम करत होत्या. त्यावेळीच विजेचा कडकडाट होऊन त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये त्या जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. रंजना धुमाळ यांच्या अचानक मृत्यूने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

Loading...
You might also like