दुर्दैवी ! मळणी यंत्रात डोक अडकल्याने शेतकरी महिलेचा जागीच मृत्यू

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – मळणी यंत्राच्या शाफ्टमध्ये डोक्याचे केस अडकल्याने एका शेतकरी महिलेचा जागीच मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यातील पोथरे (ता. करमाळा) येथे शुक्रवारी (दि. 26) दुपारी ही दुर्दैवी घटना घडली.

उषा पंडित झिंजाडे असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोथरे येथील शेतकरी पंडित झिंजाडे, मुलगा अनिकेत झिंजाडे आणि पत्नी उषा झिंजाडे हे तिघेजण मळणी यंत्रावर ज्वारीची रास करत होते. ज्वारी मळणीचे काम संपत आले असताना यंत्राखाली पडलेले भुसकट काढण्यासाठी उषा या वाकून भुसकट काढत होत्या. त्यावेळी ट्रॅक्टर आणि मळणी यंत्राच्या शाफ्टमध्ये उषा यांचा डोक्याचे केस अडकले आणि शाफ्टसोबत त्यांचे डोक फिरून ते शरीरापासून वेगळे झाले. काही समजण्याच्या आत ही दुर्घटना घडली. उषा झिंजाडे यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.