खळबळजनक ! पुरूषाच्या मृतदेहावर दिसलं महिलेच ‘शीर’, अवयव दान केंद्रातील ‘धक्‍कादायक’ प्रकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेतील एरिजोनामधील अवयव दान केंद्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला असताना धक्कादायक माहिती उघड झाली आहे. येथील बायोलॉजिकल रिसोर्स सेंटरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी पोलिसांना मानव तस्करीचे अनेक पुरावे हाती लागले आहेत. न्यूयॉर्कमधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार २०१४ मध्ये या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला होता. त्यानंतर अमेरिकेतील अनेक राज्यांत मानव तस्करी आणि मानवी अवयवाच्या तस्करीची प्रकरणे समोर अली होती.

यावेळी छाप्यादरम्यान पोलिसांना धक्का देणारी गोष्ट आढळून आली होती. यामध्ये एका महिलेच्या मृतदेहावर पुरुषाचे शीर लावलेले आढळून आले होते. या मृतदेहावर महिलेचे शीर काढून याठिकाणी पुरुषाचे शीर लावण्यात आले होते. त्याचबरोबर या तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या केंद्रात अनेक ठिकाणी काढलेले अवयव आढळून आले.

त्याचबरोबर या अवयवांवर कोणत्याही प्रकारचे लेबल्स देखील लावण्यात आले नव्हते. अनेक नागरिकांनी आपल्या नातेवाईकांचे मृतदेह या केंद्रात दान केले होते. त्यातील ३३ लोकांनी या केंद्रविरोधात तक्रार दाखल केली आहे. नागरिकांनी या केंद्रावर आरोप करताना म्हटले कि, या मृतदेहांचा वापर चांगल्या कामांसाठी होईल म्हणून आम्ही हे दान केले होते.

दरम्यान, या अवयदान केंद्राच्या मालकाला २०१५ साली अवयव तस्करीच्या आरोपाखाली एका वर्षाची शिक्षा देखील झाली होती. त्याचबरोबर एका तरुण मुलाचा मृतदेह जवळपास २ लाख रुपयाला विकला जात असे.

आरोग्यविषयक वृत्त –