पत्नीच्या प्रियकराची पतीने केली हत्या; हात-पाय तोडून रस्त्यावर टाकले

राजस्थान : वृत्तसंस्था – राजस्थान येथील एका युवकाला क्रूरपणे मारहाण करून त्याची हत्या केली आहे. ही हत्या प्रेम प्रकरणावरून झाल्याची माहिती समोर येते. मृत युवक एका विवाहित २ मुलांची आई असलेल्या महिलेबरोबर लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. म्हणून त्या महिलेचा नवरा आणि काही नातेवाईकांनी मिळून त्याचे हात पाय तोडले आणि रोडवर मरण्यासाठी फेकून दिले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. इंद्रचंद्र असे त्या मृत युवकाचे नाव आहे.

अधिक माहितीनुसार, रोडवरून जात असलेल्या काही लोकांनी युवकाला नागौरच्या जवाहरलाल नेहरू रुग्णालयात दाखल केलं. त्याची गंभीर स्थिती बघता त्याला जोधपूरला हलवण्यात आलं. त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्युपूर्वी युवकाने मारहाण करणाऱ्या लोकांची नावे पोलिसांना सांगितली. तर, एक विवाहित महिलेने आपल्या पतीला सोडलं होतं आणि तिला दोन मुलंही आहेत. यादरम्यान महिला मृत इंद्रचंद्रच्या संपर्कात आली आणि दोघांमधील जवळीकता वाढली. पतीने समजावल्यानंतरही महिला आणि प्रियकर इंद्रचंदला सोडण्यासाठी तयार झाली नाही. जवळपास २० दिवसांपासून ते एकत्र रिलेशनशिप मध्ये राहत होते,. जेव्हा हे तिच्या पतीला समजलं तर ते इंद्रचंदला मारण्यासाठी गेले. त्यांनी त्याचे हात पाय तोडून रस्त्यावरून फेकून दिले.

या दरम्यान, त्या युवकाचा मृत्यूनंतर त्याचा मृतदेह नागौरला आणण्यात आला. पोस्टमार्टमनंतर मृतदेह त्याच्या परिवाराकडे सुपूर्द केला. तसेच त्या महिलेने स्वत: जिल्ह्याची एसपी श्वेता धनकडला भेटून जीवाचा धोका असल्याची शक्यता दाखवली होती. वर्तवली होती. मात्र, पोलिसांनी काही मदत केली नाही. तेच पोलिसांनी आरोपीसहीत ४ लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्वच आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा अधिक शोध घेत आहेत.