बॉडी मसाज करण्यासाठी आलेल्या महिलेनं केलं ‘असं’ काही

पोलीसनामा ऑनलाइन – डीएलएफ फेज -4 मध्ये राहणाऱ्या एका युवतीला मोबाइल अ‍ॅप अर्बन क्लेपची बॉडी मसाजसाठी महिला बोलवणे खूप महागात पडले. या युवतीचा आरोप आहे की, मसाजसाठी आलेल्या महिलेने तिच्या घरी असलेले ५ लाख रुपये आणि डायमंडची अंगठी चोरुन नेली. युवतीच्या तक्रारीवरून डीएलएफ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये सांगितले की, ३ नोहेंबरला महिलेने अर्बन क्लेपमधून मसाज करण्यासाठी बुकिंग केले होते.

नेहमी मसाज करण्यासाठी येणाऱ्या महिलाऐवजी मसाजसाठी दुसरीच महिला आली. संध्याकाळी मसाज करण्यासाठी महिला येण्यापूर्वी त्या युवतीने तिची अंगठी, सोन्याचे ब्रेसलेट आणि इतर दागिने काढून बाथरूममध्ये ठेवले.

संध्याकाळी ६ च्या सुमारास ही महिला मसाजसाठी आली होती, सुमारे एक तासानंतर ती महिला बाथरुममध्ये हात धुण्यासाठी गेली. बॉडी मसाज करणारी महिला गेल्यानंतर ती युवती सोमवारी सकाळी ऑफिससाठी तयार होऊ लागली, यानंतर ती बाथरुममध्ये आपले दागिने घेण्यासाठी गेली तेव्हा तिला तेथे दागिने सापडले नाही.

बराच काळ शोधल्यानंतर जेव्हा युवतीला तिची अंगठी सापडली नाही, तेव्हा तिने सोसायटीच्या कंट्रोल रूममध्ये जाऊन त्या महिलेचा शोध घेतला, तेव्हा तिला समजले की मालिश केल्यावर महिलेने आपले सामान गार्ड रूममध्ये ठेवले आणि ती बाहेर गेली. सुमारे दीड तासानंतर ती ऑटो घेऊन आली आणि गार्ड रूममध्ये ठेवलेल्या सामानासह निघून गेली.

मालिश करणार्‍या महिलेने तिची अंगठी चोरून नेल्याचा आरोप त्या युवतीने केला आहे. मुलीच्या तक्रारीवरून डीएलएफ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. यासंदर्भात अर्बन क्लेप कंपनीशी संपर्क साधून महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Visit : Policenama.com