पोलिसांत तक्रार दिल्याने महिलांसह तरुणाला जबर मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महिलेने पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून महिलेसह चार जणांनी महिलांना जबर मारहाण केल्याचा प्रकार  पाटील इस्टेट परिसरात गुरुवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी चार जणांवर खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश उत्तम माने (२२, पाटील इस्टेट) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इमरान शेख, इरफान शेख, मच्छिंद्र दुबळे, आशा दुबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तरुणाच्या आईने यातील आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याचा राग आल्याने गुरुवारी सायंकाळी आरोपींनी फिर्यादी तरुणआची आई व मावशी यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच फिर्यादी तरुणाला सिमेंट ब्लॉकने मारहाण करत जखमी केले. त्यानंतर याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.