विम्याच्या ७ लाखांसाठी पोटच्या मुलाचे अपहरण

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – विम्याच्या ७ लाख रुपयांसाठी एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पोटच्या ७ वर्षीय मुलाचे अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केल आहे. तर मुलाला तिच्या आईच्या ताब्यात दिले आहे.

पतीचे निधन झाल्यानंतर महिला माहेरी राहात होती. त्यानंतर गेल्यावर्षी ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. त्यानंतर ती वर्षभर मुलांकडेही फिरकली नाही. मात्र पतीच्या निधनानंतर विम्याचे ७ लाख रुपये आपल्याला मिळावेत यासाठी तिने मुलाचा ताबा मागितला आणि आई वडीलांविरोधात तक्रार केली. एवढेच नाही तर तिने आपल्या आई वडिलांविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर तिने न्यायालयातही अर्ज केला. त्यानंतर न्यायालयाने तो अर्ज फेटाळला. आणि तिने प्रियकराच्या मदतीने कट रचला.

राजू खोदूलाल रायकवार (रा. सिडको) हा तिचा प्रियकर आहे. त्याच्यासोबत मिळून तिने मुलाचे अपहरण केले. त्यानंतर याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मुलाचा शोध सुरुकेला. दरम्यान गायब झालेली महिला गुरुवारी तिच्या मुलासह न्यायालयात अटकपुर्व जामीन मिळविण्यसाठी आली होती. त्यावेळी मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर तिच्याकडील ७ वर्षांच्या मुलाला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर तिचा प्रियकर परप्रांतात पळून गेला आहे.

Loading...
You might also like