Women Asia Cup 2022 | आजपासून रंगणार महिला आशिया चषकाचा थरार; इंडिया वि. श्रीलंका होणार पहिली लढत

सिल्हेट : वृत्तसंस्था – आजपासून महिलांच्या आशिया चषकाला (Women Asia Cup 2022) सुरुवात होणार आहे. हि स्पर्धा बांग्लादेशमध्ये (Bangladesh) खेळवण्यात येणार आहे. 1 ते 16 ऑक्टोंबरदरम्यान हि स्पर्धा होणार आहे. बांगलादेशच्या सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Sylhet International Cricket Stadium) ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत एकूण 7 संघ उतरणार आहेत. या स्पर्धेत भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात सलामीची लढत होणार आहे. (Women Asia Cup 2022)

आयसीसीने (ICC) अलीकडेच फ्युचर टूर प्रोग्राम जाहीर केला होता, ज्यामध्ये ऑक्टोबरमधील 2 आठवडे महिला आशिया चषकाला देण्यात आले होते. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, यूएई आणि यजमान बांगलादेश हे सात सहभागी होणार आहेत.2012 पासून महिला आशिया कप टी- 20 फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे. ही स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित करण्यात येते. हि स्पर्धा याअगोदर 2018 साली झाली होती. त्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर भारताचा पराभव करून बांगलादेशने पहिल्यादांच विजेतपद आपल्या नावावर केले होते. (Women Asia Cup 2022)

 

आशिया चषक 2022 साठी भारतीय महिला संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दिप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, सब्बिनेनी मेघना, रिचा घोष, स्नेह राणा, दयालन हेमलता, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, के.पी. नवगिरे.

राखीव खेळाडू – तानिया सपना भाटिया, सिमरन दिल बहादूर.

 

Web Title :- Women Asia Cup 2022 | womens asia cup is starting today and the first match is being played between india and sri lanka

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांसाठी लाभदायक आहे का दहीचे सेवन? जाणून घ्या ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी काय खावे

Vitamin D Supplements घेत असाल तर जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी, अन्यथा होऊ शकते नुकसान

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार अजय विटकर व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 98 वी कारवाई