महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि पोलिस कर्मचारी 8 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – महिला सहाय्यक निरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यास 8 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात हात पकडले. ट्रान्सपोर्टच्या गाड्या न अडविणे व त्यावर कारवाई न करण्यासाठी लाच घेतली होती. नाशिक एसीबीने ही कारवाई केली आहे.

सहाय्यक निरीक्षक वर्षा कृष्णराव कदम (वय 37) व पोलीस नाईक उमेश भास्कर सानप अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघेही नाशिक जिल्ह्यातील महामार्ग सुरक्षापथक (HSP) कोकंणगाव येथे नेमणुकीस आहेत. यातील 37 वर्षीय तक्रारदार यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. यावेळी लोकसेवक वर्षा कदम व उमेश सानप यांनी तक्रारदार यांच्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या न अडविणे व त्यावर कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 8 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. आज सापळा कारवाईत दोघांना तक्रारदार याच्याकडून8 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.

कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास दुरध्वनी क्रं. 0253-2578230 किंवा टोल फ्रि क्रं. 1064 संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.