मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

लग्न होवूनही पती सोबत राहत नसल्याने महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. पतीवर पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे मंत्रालयात दाद मागण्यासाठी आलेल्या महिलेने मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारवच रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली आहे.
[amazon_link asins=’B07417987C,B01N0WVC16′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’463ebe95-b1c9-11e8-a01a-1bb957685bbc’]

चेंबूर येथील आरसीएफ पोलिस स्टेशनच्या हद्दीत दिपाली भोसले या राहत आहेत. त्यांचे लग्न होवूनही मागील सात वर्षापासून त्यांचे पती त्यांच्या सोबत न राहता अन्य एका महिलेसोबत राहत आहेत. त्याविरोधात आरसीएफ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. परंतु पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात येत नाही, त्याविरोधात मंत्रालयातील गृह विभागात दाद मागण्यासाठी सदर महिला दीपाली भोसले या आज मंत्रालयात आल्या होत्या. मात्र त्यांना मंत्रालयात न सोडल्याने दीपाली यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच अंगावर रॉकेल ओतून घेवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मंत्रालयातील पोलिसांनी दिली.
दरम्यान, सदर महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. परंतु तिला अचानक घेरी येवून खाली कोसळल्याने त्यांना पोलिसांनी तातडीने जी.टी.हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी 

जाहिरात