हरतालिकेच्या दिवशी महिलांनी करू नयेत ‘ही’ कामे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी येणारा हरतालिकेचा सण सौभाग्यवती महिलांसाठी फार महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत आणि उपवास करतात. मात्र या दिवशी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. मात्र अनेक महिला या गोष्टी विसरतात. त्यामुळे हे व्रत करून देखील त्यांना अपेक्षित फळ मिळत नाही. आज आपण तेच नियम जाणून घेणार आहोत.

काय आहेत हे नियम
1) हे व्रत करणाऱ्या महिलांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. यासाठी महिला आपल्या हातावर मेहेंदी लावत असतात. ज्यामुळे त्यांचे मनदेखील शांत राहते.

2) हे व्रत करणाऱ्या महिलांनी रात्री झोपू नये असा नियम आहे. पूर्ण रात्र जागून या महिलांनी भजन कीर्तन करावे.

3) या दिवशी घरातील जेष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचवू नये. यामुळे व्यक्तींना चांगले फळ मिळत नाही. त्याचबरोबर या रात्री महिलांनी दूध घेऊ नये. 

आरोग्यविषयक वृत्त –