मतदान केले नाही म्हणून महिलेस बेदम मारहाण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पॅनलला मतदान न केल्याने पराभव झाल्याचा राग मनात धरून तिघांनी एका महिलेस मारहाण केली. हा प्रकार चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत खेड येथे घडला. याप्रकरणी दीपाली सोमनाथ रौंधळ (३०, रा. रौंधळवाडी पाईट, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर मीरा बाळासाहेब रौंधळ, बाळासाहेब रौंधळ, स्वप्नील रौंधळ, महेंद्र रौंधळ (सर्व रा. रौंधळवाडी पाईट, ता. खेड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी 28 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमच्या पॅनलला मतदान का केले नाही ? त्यामुळे आमचा उमेदवार पडला असे म्हणत, त्याचा राग मनात धरुन मीरा यांनी दीपाली यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. तर, तिघांनी शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करत आहेत.

पैश्याच्या वादातून महिलेस बेदम मारहाण 

चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पैशाच्या वादातून एका महिलेला बॅटने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली. जयश्री विष्णु सावंत, महेश सावंत, कमलाबाई सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वैशाली विजय कोईमारे (३२, रा. लक्ष्य सोसायटी, पुर्णानगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने आरोपी जयश्रीकडून पैसे घेतले होते. शुक्रवारी आरोपी व फिर्यादीमध्ये पैशांवरून वाद झाला. जयश्रीने फिर्यादीला ‘माझे उर्वरित पैसे दे, तू माझ्यामुळे मोठी झाली, तुझे कॅरेक्टर चांगले नाही, माझे पैसे दिले नाही तर तुला सोडणार नाही’ अशी धमकी दिली. तसेच फरशीवर ढकलून देत लाकडी बॅटने पायावर मारहाण केली. आरोपी महेश व कमलाबाईने शिवीगाळ करत ‘तू इथे कशी राहते’, अशी धमकी दिली. चिखली पोलीस तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे ‘या’ कारणासाठी येणार एकत्र