सासूला मारहाण करून महिला म्हणते, – ‘मला झपाटते चेटकीण’, वैतागून पती पोहचला कोर्टात

पेबल, ग्वाल्हेर : ग्वाल्हेरच्या फॅमिली कोर्टात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीवर आरोप करत खटला दाखल केला आहे. त्याने म्हटले आहे की, पत्नी घरातील कोणतेही काम करत नाही आणि आई लक्ष देते तेव्हा चेटकीणीने झपाटल्याचे नाटक करून आईला मारहाण करते.

त्याच्या पत्नीचे म्हणणे आहे की, ती सासूला मारहाण करत नाही, तर एक चेटकीण हे सर्व तिच्याकडून करून घेते. सोबतच पत्नीने म्हटले की, तिला पतीसोबत राहायचे नाही आणि तिला पतीकडून पोटगी हवी आहे. परंतु, या प्रकरणात सांगितले जात आहे की, या दाम्पत्याचे अगोदर सुद्धा अनेकवेळा कौन्सिलिंग केले गेले आहे. परंतु, प्रकरण मार्गी लागण्याऐवजी आणखीच गुंतत चालले आहे.

माहितीनुसार, संजय (बदललेले नाव) चा विवाह रूपा (बदललेले नाव) सोबत सुमारे तीन वर्षापूर्वी झाला होता. सध्या त्यांना एक वर्षाचा मुलगा सुद्धा आहे. संजय यांनी सांगितले की, तो जेव्हा जॉबसाठी ते बाहेर जातात तेव्हा रूपा, त्यांच्या आईला मारहाण करते. जेव्हा ते परतत असत तेव्हा त्यांची आई सर्व प्रकार त्यांना सांगत असे. तर, याबाबत संजय जेव्हा रूपाला विचारतात तेव्हा ती नेहमी हेच सांगते की, मी सासूला मारत नाही, तर मला चेटकीण झपाटते, ती आईला मारहाण करते.

संजय यांनी आरोपात हे सुद्धा सांगितले की, मागील काही काळापासून यामुळे भांडणं खुप वाढली आहेत. सोबतच ते आपल्या सासूमुळे सुद्धा त्रस्त आहेत, ती मागील काही काळापासून सतत येत आहे आणि घरातील प्रकरणात लक्ष घालत आहे. या दरम्यान जेव्हा कोरोनामुळे लॉकडाऊन झाले तेव्हा प्रकरण इतके वाढले की, रूपा सर्व कुटुंबाला सोडून आपल्या आईकडे निघून गेली. आता तिला सोबत राहायचे नाही आणि खर्च मागत आहे.

असे सांगितले जात आहे की, या प्रकरणात पती-पत्नीचे पुन्हा कौन्सिलिंग करण्यात आले. कौन्सिलिंगच्या दरम्यान पतीने सांगितले की, ती दिवसभर चांगल्या मूडमध्ये असते, परंतु सायंकाळी काम करण्याची वेळ होताच ती चेटकीणीने झपाटल्याचे नाटक करून आईला मारहाण करू लागते.