भिकारी महिलेच्या अकाऊंटमध्ये निघाले ‘एवढे’ पैसे की बँकेतील ‘कॅश’च संपली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रवास किंवा कोणत्याही हॉस्पिटल, शाळा आणि स्टेशन इत्यादी सर्वच ठिकाणी तुम्हाला भीक मागणारे लोक दिसतील. कधी-कधी भिखाऱ्यांचा वेश पाहून आपण त्यांना मदत म्हणून किंवा दयेपोटी पैसे देत असतो. मात्र ते लोक या पैशांचं नेमकं काय करणार किंवा त्यांची परिस्थिती खरंच दिसते तशी आहे का याचा आपल्याला अजिबातही अंदाज नसतो. अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे जी ऐकून तुम्हीदेखील आश्चर्यचकित व्हाल. एका भिकारीण महिलेच्या बँक खात्यात इतका पैसा होता की जेव्हा ही महिला पैसे काढायला गेली त्या वेळी तिला तिचे पैसे देताना चक्क बँकेतील सर्व रोकड संपून गेली आणि बँकेला पैसे कमी पडले.

दरम्यान, या भिकारीणीच्या खात्यात एकूण ६.३७ कोटी रुपये असल्याचे उघडकीस आले आहेत. हा खुलासा झाल्यानंतर ही भिकारी आणि ती जिथे भीक मागते जी जागा प्रचंड चर्चेत आली आहे आणि ही बाब अत्यंत मनोरंजक मार्गाने उघड झाली आहे.

हे प्रकरण लेबनॉनमधील सिदोन या शहरातील आहे. इथल्या एका प्रसिद्ध दवाखान्यासमोर वफा मोहम्मद नावाची एक महिला दिवसभर भीक मागायची. गेली दहा वर्षे ती हे करत होती. वफा मोहम्मद नावाच्या या बाईकडे किती पैसे असतील याची मात्र कोणालाही कल्पना नव्हती.

असा झाला खुलासा :
मिळालेल्या वृत्तानुसार वफा मोहम्मद तिचे पैसे एका बँकेतून दुसर्‍या बँकेत वर्ग (ट्रान्सफर) करण्यासाठी पोहोचली होती. हे करत असताना बँकेत रोख रकमेची समस्या उद्भवली. त्यानंतर वफाचे दोन धनादेश सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

वफाच्या दोन्ही धनादेशांवर ३० सप्टेंबर २०१९ ची तारीख आहे. हा चेक व्हायरल होताच हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. सोशल मीडियावरही लोक याची मोठ्या प्रमाणावर चर्चा करत आहेत.

भीक मागूनच एवढी रक्कम जमा :
तर वफा मोहम्मद यांना याबाबतीत विचारले असता त्यांनी भीक मागून एवढे पैसे जमा केले असल्याचे सांगितले. ती ज्या रुग्णालयाच्या बाहेर भीक मागत असे त्या रूग्णालयाची एक परिचारिक हाना एस यांना याबाबत विचारले असता त्यांनी वफा यांना ओळखत असल्याचे आणि ती गेली दहा वर्षे रुग्णालयाच्या गेटवर उभी राहून भीक मागत असल्याची माहिती दिली.

Visit : Policenama.com