Buldana News : 34 वर्षीय महिलेला मध्य प्रदेशात नेऊन विकलं ! 4 जणांविरोधात FIR

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाईन – देव दर्शनाला नेण्याच्या बहाण्यानं एका 34 वर्षीय महिलेला मध्य प्रदेशात उज्जैनलगतच्या परिसरात नेऊन तिची विक्री करत एकाशी लग्न लावून दिल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांविरधात गुन्हा दाखल केला आहे. 4 फेब्रुवारी रोजी ही घटना उघडकीस आली.

बुलडाणा येथील केदार रोजारिया यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ऑक्टोबर 2020 दरम्यान संबधित महिलेसोबत हा प्रकार घडला होता. पीडित महिलेनं या प्रकरणी बुलडाण्यात संपर्क साधल्यानंतर संपूर्ण प्रकरण उजेडात आलं.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचा एक पथक पीडित महिलेला आणण्यासाठी मध्य प्रदेशात रवाना झालं आहे अशी महिती पोलीस अधिकारी सुधाकर गवारगुरू यांनी दिली.

पीडित महिलेचा मुलगा हा स्थानिक विष्णूवाडीत काम करतो. मुलगा अल्पवयीन असल्यानं ज्या ठिकाणी तो काम करतो त्याच्या मालकानं पोलिसात तक्रार दिली. बुलडाणा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.