‘या’ महिलेला ऐकू येत नाही पुरुषांचा आवाज 

बीजिंग : वृत्तसंस्था – आपल्या शरीरातील सर्व अवयवांचे काम हे वेगवेगळे आहे. तसेच कानाचे काम हे ऐकण्याचे आहे. परंतु कानांना कधी पुरुषांचा आवाज ऐकू आला नाही असे तुम्ही कधी ऐकले आहे का? ऐकायला जरा विचित्र वाटत असेल ना ? परंतु हे खरं आहे की, एक महिला अशी आहे की, जिला  स्त्रियांचा आवाज ऐकू येतो, पण पुरुषांचा आवाज ऐकू येत नाही. एका आजाराने ती त्रस्त असल्याने ही समस्या उद्भवली आहे.
पुरुषांचा आवाज ऐकू न येणारी ही महिला चीनमधील आहे. ही महिला सध्या  Rare Hearing-Loss condition या आजाराने त्रस्त आहे. त्यामुळेच तिला पुरुषांचा आवाज ऐकू येत नाही. चेन असे या महिलेचे नाव आहे. चीनमधी चेन ही  जियामेन येथील रहिवासी आहे.
चेन एक दिवस झोपेतून उठली तेव्हा तिच्या लक्षात आले की, तिला तिच्या बाॅयफ्रेंडचा आवाज ऐकू येत नाही. त्यानंतर तिला उपचारासाठी ‘क्‍विंपू’ नामक  हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी आवश्यक त्या सर्व तपासण्या केल्या. मात्र, त्यानंतर डॉक्टरांनी जे काही सांगितले त्यावर विश्‍वास ठेवणे अवघड बनले. ही महिला Reverse-slope hearing loss (RSHL) ने त्रस्त असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या आजाराला low-frequency hearing loss असेही म्हणतात. यामध्ये कमी तीव्रतेचा आवाज ऐकू येत नाही. ज्या लोकांना ऐकण्यात समस्या येतात, ते उच्च तीव्रतेचा आवाजही ऐकू न येणे, या समस्येने त्रस्त असतात. म्हणजे त्यांना (high-pitched voices/sounds  ऐकण्यात समस्या येतात. म्हणजेच  पुरुषाचा भारी आवाज ऐकू न येण्याच्या आजाराने चेन ही त्रस्त होती. मात्र, जगभरात या आजाराचे प्रमाण अत्यंत कमी आहे.